लखनौ : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत मतदारसंघाचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधी यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात वरुण गांधी एका व्यक्तीवर संतापल्याचं ऐकायला मिळत आहे. मद्यतस्काराने रात्री उशीरा वरुण गांधी यांना फोन करुन मदत मागितली तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले (BJP MP Varun Gandhi pilibhit viral audio of illegal liquor ).
व्हायरल होणाऱ्या ऑडिओत एका बाजूने वरुण गांधी बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूने सर्वेश नावाचा व्यक्ती बोलत आहे. यावेळी रात्री उशीरा फोन केल्यानं खासदार वरुण गांधी संबंधित व्यक्तीवर संतापतात आणि मी तुझ्या बापाचा नोकर नाही, असं सुनावतात. वरुण गांधी यांना फोन करणारा व्यक्ती सर्वेशच्या घरात रात्री पोलिसांनी छापा टाकला होता. यात संबंधिताच्या घरात बेकायदेशीरपणे दारु सापडली. तो बेकायदेशीरपणे दारु विकत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पोलिसांनी दारु सापडल्यानंतर आरोपी सर्वेशविरोधात कारवाई करुन त्याला ताब्यात घेतलं. यानंतर त्याला पोलीस स्टेशनवर आणण्यात आलं. त्यावेळी सर्वेशने तेथूनच खासदार वरुण गांधी यांना मदतीसाठी फोन केला. रात्री 10 वाजता फोन आल्याने वरुण गांधी चांगलेच भडकले. त्यांनी सर्वेशवर संताप व्यक्त करत सुनावले. हा ऑडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
BJP सांसद वरुण गांधी जनता को कह रहे हैं कि मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ। वरुणजी पिछले हफ्ते ही हाईकोर्ट ने कहा था ‘सरकार जनता की सेवक है शासक नहीं।’ लेकिन सामंतवाद भाजपा की परम्परा है और पिछड़े-दलित आपके लिये सांप-छछूँदर।
जनता इसका जवाब देगी “कौन किसके बाप का नौकर है?”— Sunil Singh Yadav (@sunilyadv_unnao) October 19, 2020
समाजवादी पक्षाचे नेते सुनील सिंह यादव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केलं आहे. यात ते म्हणाले, “भाजप खासदार वरुण गांधी जनतेला मी तुमच्या बापाचा नोकर नाही असं म्हणत आहे. वरुणजी मागील आठवड्यातच न्यायालयाने सरकार जनतेची शासक नसून सेवक असल्याचं म्हटलंय. मात्र सामंतवादी भाजपची ही परंपरा आहे. वंचित, दलित घटक कोण कुणाच्या बापाचा नोकर आहे याचं उत्तर जनता देईल.”
संबंधित बातम्या :
वरुण गांधी भाजप सोडून काँग्रेसमध्ये येणार? राहुल गांधी म्हणतात…
BJP MP Varun Gandhi pilibhit viral audio of illegal liquor