VIDEO : भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या भावाची दुकानदाराला बेदम मारहाण
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेणू देवीचे भाऊ पिनू यांनी बिहारच्या बेतियामधील एका दुकानदाराला मारहाण केली आहे.
पाटणा (बिहार) : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेणू देवीचे भाऊ पिनू यांनी बिहारच्या बेतियामधील एका दुकानदाराला मारहाण केली आहे. या मारहाणीत दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. शिल्लक कारणावरुन ही मारहाण झाल्याचे म्हटलं जात आहे. ही घटना 3 जून रोजी झाली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पिनू अत्यंत वाईट प्रकारे दुकानदाराला मारहाण करत आहे. पिनूसोबतच्या सहकाऱ्यांनीही त्या दुकानदाराला मारहाण केली आहे.
भाजपा नेत्याचा भाऊ हातात मोबाईल घेऊन दुकानात जातो. तो आपला मोबाईल दुकानदाराला दाखवतो. तसेच त्याच्या जवळ जाऊन त्याला मारहाण करतो. दुकानदारही सुरुवातीला त्याचा विरोध करतो. पण दोन-तीन लोक त्याला मारहाण करण्यास सुरुवात करतात.
पिनूचे दुकानात मारहाण करुन मन न भरल्याने तो दुकानदाराला पकडून बाहेर घेऊन जातो. पावर हाऊसमध्ये घेऊन जाऊन काठीने मारहाण करतो. दुकान मालकाने पिनूला फोन केला, तर त्याला गोळी मारेल अशी धमकीही देण्यात येते, या घटनेचा ऑडिओही व्हायरल होत आहे.