नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया (BJP national spokesperson Gaurav Bhatia ) यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे. भाटीया यांनी याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शऱद बोबडे यांना पत्र लिहिले आहे. (BJP national spokesperson Gaurav Bhatia claimed that arrest of Arnav Goswami is violation of human rights)
“महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना केलेली अटक ही पूर्णपणे असंवैधानिक आहे. ही अटक अवैध तर आहेच; पण त्याच बरोबर यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचेही दिसत आहे. रिपब्लिक मीडिया आणि त्याचे संपादक अर्णव गोस्वामी यांना लक्ष्य केलं जातंय. तसेच त्यांनी अपमानीतही करण्यात येतंय. अर्णव यांनी पालघर साधू हत्या, सुशांतसिंह राजपूत आतम्हत्या प्रकरण तसेच अन्य प्रकरणात महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली जात आहे.” असं गौरव भाटिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
त्याचबरोबर भाटिया यांनी, अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे भारतीय लोकशाहीच्या चौथ्या खांबावर थेट प्रहार आहे, असंही सरन्याधीशांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद बोलवून रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला. बंद करण्यात आलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करुन गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर 2020 च्या सकाळी अटक केली. ही सर्व उदाहरणं सत्तेच्या दुरुपयोगाची आहे, असंही भाटिया म्हणाले.
Senior Advocate and BJP Spokesperson Gaurav Bhatia writes to CJI SA Bobde.
Says arrest of Arnab Goswami is UNCONSTITUTIONAL. #ArnabGoswamy #BombayHighCourt @gauravbh pic.twitter.com/Or36UPxWNz
— Bar & Bench (@barandbench) November 9, 2020
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालायने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सत्र न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याच्या पोलिसांच्या याचिकेवर सोमवारी (9 नोव्हेंबर) युक्तिवाद झाला. त्यामुळे अर्णव यांच्या जामिनाच्या अर्जावर आज कामकाज होऊ शकले नाही. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने अर्णव यांना आजची रात्रही तळोजा तुरुंगात काढावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस
अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम
राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ
(BJP national spokesperson Gaurav Bhatia claimed that arrest of Arnav Goswami is violation of human rights)