भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन

शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन
गिरीश महाजन, भाजप नेते.
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 4:51 PM

जळगाव : शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी (BJP Protest In Jalgaon ) मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला (BJP Protest In Jalgaon ).

शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवले नाहीत, तर भाजपकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीककर्ज त्वरित मिळावे, कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालीच पाहिजे, कृषी कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा अनेक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. माजीमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले (BJP Protest In Jalgaon).

आंदोलनापूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर माजीमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांसमोर भाजपची भूमिका मांडली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे राज्याचा कारभार सांभाळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यावर्षी पावसाळा सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालेली नाही. शेतकऱ्यांना खरिपचे पीककर्ज मिळालेले नाही. कर्जमाफी योजनेची अजूनही प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांशी निगडित प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी सरकारवर करण्यात आला (BJP Protest In Jalgaon).

संबंधित बातम्या :

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.