भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातील दोन नावांवर शिक्कामोर्तब

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे (Rajyasabha BJP Candidate list). यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातील दोन नावांवर शिक्कामोर्तब
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 6:30 PM

नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे (Rajyasabha BJP Candidate list). महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या कोट्यातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित उमेदवारीचा प्रश्न भाजपने निकाली काढला आहे.

उदयनराजे भोसले उद्या (12 मार्च) आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुले एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवारही ठरला

राज्यसभेसाठी महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

संबंधित बातम्या:

उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली, राज्यसभेचं तिकीट मिळण्याची चिन्हं

Rajyasabha BJP Candidate list

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.