… तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

... तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 10:32 PM

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारने आपले घटनात्मक दायित्व पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. राज्य सरकारला जर आताही जाग आली नाही, तर महिलाच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील. ती वेळ दूर नाही, अशाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला. त्यांनी ट्विट करत या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली (BJP state president Chandrakant Patil on Beed Acid Attack and Murder).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा अत्यंत वेदनादायी प्रकार घडला आहे. अखेर 12 तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली. सरकारकडून फारशी अपेक्षा नाही, पण राज्य सरकारला आता जागी झाली नाही, तर महिलासुद्धा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतः कायदा हातात घेतील आणि आता ही वेळ दूर नाही.”

“कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण राज्य सरकार असंवेदनशील आहे, हे तर संपूर्ण देशाला माहीत आहे. पण तरीही जोपर्यंत राज्य करत आहेत, तोपर्यंत आपले घटनात्मक दायित्व पूर्ण करावे, अशी छोटीशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो,” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज (15 नोव्हेंबर) तिचा मृत्यू झाला.

मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती.

देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले (Beed Acid Attack).

जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराचा अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

Beed Acid Attack : प्रेयसीला अॅसिड टाकून जाळणाऱ्या नराधमाला नांदेडमध्ये अटक

संबंधित व्हिडीओ :

BJP state president Chandrakant Patil on Beed Acid Attack and Murder

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.