पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या
पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या त्रासाला कंटाळून या कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

औरंगाबाद : पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या त्रासाला कंटाळून या कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे (BJP Supporter commit suicide). पंकज संकपाळे असं आत्महत्या केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली, यामध्ये त्याने तीन पोलिसांची नावे उघड केली आहेत (BJP Supporter commit suicide).
पंकज हा भाजपचा कार्यकर्ता होता. तो माहिती व अधिकारामध्ये काम करायचा. या कामाअंतर्गत त्याच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे तो त्रस्त झाला होता. याप्रकरणी न्यायलयात खटलाही सुरु होता. या सर्वांमध्ये उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस त्याला त्रास देत असल्याने पंकज संपकाळे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहेत.
पंकज संपकाळे याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंकजचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्या केलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या संतप्त नातेवाईकांनी मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत या पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळे पंकज संकपाळे यांचा मृतदेह सध्या घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात ठेवण्यात आला आहे.