राहुल गांधी माझ्याजवळ येऊन उभे राहीले… भाजपाच्या महिला खासदाराची राज्यसभेच्या सभापतींना तक्रार
एक महिला म्हणून मला ते अवघडल्या सारखे झाले. मी मोठ्या मनाने आपल्याला लोकशाही अधिकार असतानाही मागे हटले आणि एका बाजूला झाले. परंतू मला वाटते की एका खासदाराने असे वागू नये असे महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी तक्रारीत म्हटले आहे.
![राहुल गांधी माझ्याजवळ येऊन उभे राहीले... भाजपाच्या महिला खासदाराची राज्यसभेच्या सभापतींना तक्रार राहुल गांधी माझ्याजवळ येऊन उभे राहीले... भाजपाच्या महिला खासदाराची राज्यसभेच्या सभापतींना तक्रार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/rahul-gandhi-and-nagaland-mp.jpg?w=1280)
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर संसदेत आज पुन्हा हंगामा,धक्काबुक्की झाली आहे. संसदेत आज भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदाराविरोधात घेराबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्याने नंतर दोन्ही गटात मोठी धुमशान झाले.काँग्रेसचे खासदार मकरद्वारवर चालून आले. या गोंधळात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर महिला खासदाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राहुल गांधी यांनी धक्का मारल्याचा आरोप एकीकडे प्रताप सारंगी यांनी केल्यानंतर आता महिला खासदारानेही त्यांच्यावर आरोप केल्याने वाद वाढतच चालला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी एका महिला खासदाराकडून तक्रार आल्याचे मान्य केले आहे.
नागालँडच्या महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी देखील या महिला खासदाराने तक्रार केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की महिला खासदार माझ्या दालनात रडत आल्या आणि त्यांनी लेखी तक्रार केली आहे.त्या महिला खासदाराला या घटनेचा प्रचंड मानसिक धक्का बसला होता. आपण याची गंभीर दखल घेतली असून त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही धनखड यांनी म्हटलेले आहे.
काँग्रेसेचे संतुलन ढळलेय
काँग्रेसचे पराभवाने मानसिक संतुलन ढळले आहे.राहुल गांधी यांना गैर लोकशाही मार्गाने आमच्या खासदारांना धक्काबुक्की केलेली आहे. आमचे दोन खासदार या घटनेत जखमी झाले आहेत.नागालँडच्या महिला खासदार सांसद फांगनोन कोन्याक यांना राहुल गांधी यांनी धक्का दिला आहे. हा महिला खासदाराच्या शोषणाचा प्रकार असल्याचे भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/New-Project-2024-12-18T212608.704.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/santosh-deshmukh.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/NAVY-BOAT-.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/chhagan-bhujbal-obc.jpg)
‘राहुल गांधी जवळ येऊन उभे राहीले…’
नागालँडच्या भाजपा अध्यक्ष फांगनोन कोन्याक यांनी आजच्या आंदोलनात आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार केली आहे. महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी सांगितले की मी राज्यसभेच्या सभापतींना भेटून संरक्षणाची मागणी केलेली आहे. मला अजूनही हा प्रकार सहन होत नाहीए..आज मी शांततेने संसदेच्या बाहेर शांततेने निदर्शने करीत होते. राहुल गांधी एकदम जवळ येऊन उभे राहीले.मी आज अवघडलेली होते. मी खूपच अन्फर्टेबल झाले. राहुल गांधी माझ्यावर ओरडू लागले. राहुल गांधी यांना हे शोभत नाही. एका महिला खासदारावर असे ओरडणे शोभते का ? मी खूप दु:खी आहे, मला संरक्षण हवे. मी अनुसुचित जमातीची खासदार आहे. राहुल यांचे वागणे बरोबर नाही असे खासदार फांगनोन कोन्याक यांनी म्हटले आहे.
महिला खासदारने पत्रात काय लिहिले..
आपण मकरद्वार ( संसद ) जवळील पायऱ्यांजवळ खाली हातात फलक घेऊन होतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांसाठी प्रवेशद्वापर्यंत सुरक्षित रस्ता बनविला होता. अचानक विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्यांच्या पक्षाच्या खासदारांसह आमच्या समोर आले. त्यांच्यासाठी रस्ता बनविलेला असताना ते तेथे का आले असा सवाल महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी पत्रात केला आहे. त्यांनी जोराने ओरडण्यास सुरुवात केली. ते माझ्या इतक्या जवळ आले की मी अनकम्फर्टेबल झाले असेही त्यांनी राज्यसभेच्या सभापतींना लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.