‘मोगली’नंतर खराखुरा ‘बगिरा’ चंद्रपूरच्या ताडोबात दिसला!
चंद्रपूर: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिन होता आणि त्याच दिवशी प्रकल्पातील कोळसा भागात या बिबट्याने दर्शन दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांसह हा काळा बिबट्या नवे आकर्षण ठरला आहे. जनुकीय बदलाने असे रूप घेतलेल्या डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक आनंदी झाले आहेत. सध्या […]
चंद्रपूर: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिन होता आणि त्याच दिवशी प्रकल्पातील कोळसा भागात या बिबट्याने दर्शन दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांसह हा काळा बिबट्या नवे आकर्षण ठरला आहे. जनुकीय बदलाने असे रूप घेतलेल्या डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक आनंदी झाले आहेत. सध्या या बिबट्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
जंगल बूक सिनेमात मोगलीचा मित्र म्हणून काला बिबट्या पाहायला मिळाला होता. आता तसाच बगिरा चंद्रपूरच्या व्याघ्र प्रकल्पात पाहायला मिळाल्याने प्राणीप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.