Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे आज (29 एप्रिल) वयाच्या 54 व्या वर्षी निधन (Bollywood Actor Irrfan Khan died) झाले.

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 2:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे आज (29 एप्रिल) वयाच्या 54 व्या वर्षी निधन (Bollywood Actor Irrfan Khan died) झाले. त्यांची तब्येत बिघडल्याने काल त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान इरफान यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन वर्षांपासून ते न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)

इरफान खान यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

इरफान खान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये  राजस्थानमधील जयपूर येथे झाला. इरफान खान हे एम.ए. करत असताना त्यांना दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.

चाणक्य या हिंदी मालिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. त्यानंतर 1994 मध्ये द ग्रेट मराठा या मालिकेत त्यांना रोहिल्ला सरदारची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1988 मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट ‘सलाम बॉम्बे’मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्याचं नाव नॉमिनेट करण्यात आले होते.

त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी आणि बऱ्याच मालिकेतही काम केलं आहे. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत जवळपास 30 पेक्षा बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांसह बऱ्याच मालिकेतही काम केलं आहे. चाणक्य, भारत एक खोज, सारा जहान हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता, यासारख्या अनेक मालिका गाजल्या.

स्लमडॉग मिलनिअर या चित्रपटातही त्यांनी काम केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा पान सिंग तोमर हा चित्रपट चांगलाच गाजला. यात त्यांनी एका अॅथलेटिकची भूमिका साकारली होती. गुंडे, जुरासिक वर्ल्ड, पिकू, जसबा, तलवार यासारख्या चित्रपटात त्यांनी अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

त्याशिवाय त्यांनी ए माईटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेअर आणि द अमेझिंग स्पायडर या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 

2003 मध्ये त्यांना हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2007 लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला होता. याशिवाय पानसिंग तोमर या 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३० बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

२०१७ ला प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होते. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला होता. भारत आणि चीनमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाला होता. दुदैवाने हा त्यांचा शेवटचा चित्रपट (Bollywood Actor Irrfan Khan died) ठरला.

संबंधित बातम्या : 

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.