Asif Basra | आसिफ बसरांच्या जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का, पाहा सहकलाकारांच्या प्रतिक्रिया…
आसिफ बसरा यांच्या निधनाबद्दल जाणून बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई : बॉलिवूड पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनेने हादरलं आहे. ‘काय पो छे’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकलेला अभिनेता आसिफ बसराने (Actor Asif Basra suicide) आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील मॅकलॉडगंज इथं त्याने आयुष्य संपवलं. आसिफने आत्महत्या केल्याने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे (Bollywood Actors Reaction on Asif Basra’s Suicide).
आसिफ बसरा यांच्या निधनाबद्दल जाणून बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे. चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी ट्विट करत म्हटले की, ‘आसिफ बसरा! हे सत्य असू शकत नाही… हे फार वाईट आहे.’
Asif Basra! Can’t be true… This is just very, very sad.
— Hansal Mehta (@mehtahansal) November 12, 2020
‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’मध्ये आसिफसोबत काम केलेल्या अभिनेता इमरान हाश्मीने त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. ‘आरआयपी आसिफ भाई’, असे ट्विट इमरान हाश्मी यांनी केले आहे (Bollywood Actors Reaction on Asif Basra’s Suicide).
Rip Asif bhai ? pic.twitter.com/uOXALTsHlg
— Emraan Hashmi (@emraanhashmi) November 12, 2020
आसिफच्या मृत्यूची बातमी ऐकून अभिनेते मनोज बाजपेयीही हैराण झाले आहेत. ‘काय? हे अत्यंत धक्कादायक आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही एकत्र चित्रीकरण केले होते. अरे देवा.’, असे ट्विट करत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
What? This is too shocking!! Shot with him just before Lockdown!!! Oh My God!!! https://t.co/alfYTGxChH
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) November 12, 2020
(Bollywood Actors Reaction on Asif Basra’s Suicide)
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
??????? noooooooooo! https://t.co/3X1uDSnG6D
— Swara Bhasker (@ReallySwara) November 12, 2020
नैराश्याला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता
आसिफ यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, मागील काही काळापासून ते नैराश्यात होते. आसिफ यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुळचे अमरावतीचे असणारे आसिफ बसरा हे गेल्या 5 वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची परदेशी मैत्रीण देखील राहत होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार गुरुवारी (12 नोव्हेंबर) दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्याच कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले (Bollywood Actors Reaction on Asif Basra’s Suicide).
आसिफ बसरा कोण आहेत?
अभिनेते आसिफ बसरा यांनी निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये आणि राहुल ढोलकीया यांच्या ‘परझानिया’ चित्रपटांत केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. यानंतर त्यांचं भरपूर कौतुकही झालं. विशेष म्हणजे त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’ या चित्रपटातही भूमिका केली होती.
आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज अभिनेत्यांसोबतही काम केलं होतं. ते मिचेल ओ साजबेलंड यांच्या ‘वन नाईट विथ किंग’ या चित्रपटातही झळकले होते. या चित्रपटात त्यांनी ओमर शरिफ आणि पेटर ओ टूल यांच्यासोबत काम केलं.
आसिफ बसरा यांनी 2010च्या गाजलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात शोएब या पात्राची भूमिका केली होती, ज्यात ते इमरान हाश्मीच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी ‘लम्हा’ या हिंदी चित्रपटातही दमदार भूमिका केली होती.
(Bollywood Actors Reaction on Asif Basra’s Suicide)