कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

| Updated on: Sep 08, 2020 | 5:15 PM

अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut News Update) 

कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार
Follow us on

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतची चौफेर कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut News Update)

कंगना उद्या बुधवारी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. मनालीच्या राहत्या घरातून ती मुंबईत येण्यासाठी रवाना झाली आहे. कंगनाच्या घरी 8 सप्टेंबरला सकाळी 10.40 वाजता पोलीस आणि CRPF ने बैठक बोलवली होती. या बैठकीत कंगनाने मुंबईत येण्यासाठी रुट मॅप बनवला आहे. याद्वारे ती मनालीच्या घरातून मुंबईत येण्यासाठी रवाना झाली आहे.

कंगना बुधवारी मनालीपासून चंदीगडपर्यंत रस्त्यामार्गे येईल. तिथून पुढे ती मुंबईत विमानाद्वारे येऊ शकते. कारण मनालीपासून मुंबईत येण्यासाठी सद्यस्थितीत एकही विमान नाही. Bhuntar आणि कुल्लू हे मनालीपासून जवळील विमानतळ आहे. त्यातील कुलू विमानतळापासून मंगळवारी 11.30 वाजता मुंबईची फ्लाईट आहे. या फ्लाईटने ती मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतचं कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा – कंगनाच्या मदतीला केंद्र सरकार, Y+ दर्जाची सुरक्षा, कंगनाकडून अमित शाहांचे आभार

अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं. पण ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययन या मुलाखतीत म्हटलं आहे. या मुलाखतीच्या आधारे कंगनाची चौकशी केली जाणार आहे, असे अनिल देशमुखांनी सांगितले.

 

कंगनाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव 

इतकंच नव्हे तर कंगना रनौतविरोधात काँग्रेसनं विधानपरिषदेत हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसाठी वाटतं आहे, असे ट्विट तिने होते. या वक्तव्यावरुन कंगनाने मुंबईची बदनामी केल्याचे सांगत काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत: यावर निर्णय घेईन, असं निंबाळकर यांनी यावेळी म्हटलं.

कंगनासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेनेनं विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला होता. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन देत चर्चेची मागणी केली.

कंगनाच्या ऑफिसला पालिकेची नोटीस 

याशिवाय मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल परिसरातील तिच्या ऑफिसला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तिच्या कार्यालयात अनधिकृतपण बांधकाम केले आहे. तिने राहत्या घराची ऑफिसमध्ये निर्मिती केली आहे.

त्यामुळे कलम 351 अंतर्गत पालिकेने ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसचे पुढील 24 तासात स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. तसेच अतिरिक्त बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे द्या, असे आदेशही पालिकेने दिले आहे. त्याशिवाय जर अनधिकृत बांधकाम असेल तर स्वतः ते काढून टाका, अन्यथा पालिका ते बांधकाम तोडणार, असेही यात म्हटले आहे. त्यामुळे कंगनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम

1) ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे.

2) स्टोअर रूमचा किचन रूममध्ये रूपांतर

3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट

4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार

5 ) देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन

6 ) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय

7 ) समोर बाजूस अनधिकृत सैलब ची निर्मिती

8 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती

9 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती (Bollywood Actress Kangana Ranaut News Update)

संबंधित बातम्या : 

कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला

केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला