Marathi News Latest news Bollywood celebrities who work out and cycling during corona pandemic lockdown
PHOTO : ना योगा, ना वॉकिंग, बॉलिवूडचा नवा फिटनेस मंत्रा!
सलमान खान, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, सारा अली खान अनेक कलाकार रस्त्यावर सायकल चालवताना दिसले. (Bollywood Celebrities Cycling during Lockdown)
Follow us
कोरोना काळात कलाकारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सूर्यनमस्कार करण्यापासून योगापर्यंत, धावण्यापासून ते एक्सरसाईज करण्यापर्यंत सर्वजण वेगवेगळे वर्कआऊट करत असतात.
लॉकडाऊनपासून बॉलिवूडमध्ये एक नवा फिटनेस मंत्रा रुजू झाला आहे तो म्हणजे सायकलिंग…
लॉकडाऊन काळात सलमान खान, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, सारा अली खान, जॉन अब्राहम यासारखे अनेक कलाकार रस्त्यावर सायकल चालवताना दिसले.
अभिनेता रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी घराबाहेर एक फॅन्सी सायकल चालवताना दिसला. तसेच सायकल चालवताना त्याने मास्कही लावला होता.
अभिनेता आयुषमान खुराना सध्या त्याच्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने चंदीगडमधील रस्त्यांवर सायकल चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा अनेकदा सायकल चालवताना दिसतो. बिझी शेड्युलमध्येही वेळात वेळ काढून सायकल चालवतो.
लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्री डेजी शाहने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सायकल चालवणं सुरु केलं होतं. ती आठवड्यातून पाच दिवस सायकलिंग करते.
तसेच अभिनेत्री सारा अली खानही तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत सायकल चालवताना दिसत आहे. त्या दोघांनी याबाबतचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.