बदनामीविरोधात बॉलिवूड आक्रमक, ‘त्या’ न्यूज चॅनलविरोधात थेट हायकोर्टात धाव

बॉलिवूडमधील 4 प्रमुख संघटना आणि 34 निर्मिती संस्था यांनी एकत्रितपणे माध्यमांतील काही चॅनल्स विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

बदनामीविरोधात बॉलिवूड आक्रमक, 'त्या' न्यूज चॅनलविरोधात थेट हायकोर्टात धाव
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:27 PM

नवी दिल्ली : सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॅकफूटवर गेलेल्या बॉलिवूडनं आता पलटवार केला आहे. बॉलिवूडमधील 4 प्रमुख संघटना आणि 34 निर्मिती संस्था यांनी एकत्रितपणे माध्यमांतील काही चॅनल्स विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.( 4 Bollywood industry Assns & 34 leading Bollywood producers against tv channels goes to Delhi High court)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध स्वैर आरोप करणाऱ्या चॅनल्स विरुद्ध कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बॉलिवूडच्या या पावलाचं काँग्रेस नेते संजय निरुपरम यांनी देखील स्वागत केलं आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नऊ यांची नावं असल्याची माहिती आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख संघटना:

द प्रोड्युसल गिल्ड ऑफ इंडिया द सिने एन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन द फिल्म एन्ड टीव्ही प्रोड्युसर्स कॉऊन्सिल स्क्रीनराईटर्स असोसिएशन

न्यायालयात धाव घेतलेल्या निर्मात्यांची नावं: आशुतोष गोवारिकर शाहरुख खान सलमान खान सोहेल खान रोहित शेट्टी विधु विनोद चोप्रा आमिर खान अजय गेवगण अक्षय कुमार यशराज फिल्मस धरमा प्रॉडक्शन अनिल कपूर अरबाज खान फरहान अख्तर राकेश रोशन साजिद नाडियादवाला कबीर खान विशाल भारद्वाज राकेश ओमप्रकाश मेहरा सिध्दार्थ रॉय कपूर

यांच्यासह इतर अभिनेत्यांच्या निर्मिती संस्थानी न्यायलयात धाव घेतली आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांचं ट्विट यांनी बॉलिवूडच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. चित्रपटश्रृष्टीनं त्यांच्यातील जीवंतपणा दाखवून दिला. 38 निर्मिती संस्थांनी आज न्यायालयात धाव घेतली.  बदनामी विरोधात आवाज उठवला. बॉलिवूडला अशीच एकता दाखवावी लागेल. अंहकारातून बाहेर पडून गुणवंताचा सन्मान करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन रॅकेटचा पर्दाफाश केला होता. “सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवणाऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यातच आता बॉलिवूड कलाकारांनी त्या चॅनेल्सविरोधात मोर्चा उघडला आहे.

संबंधित बातम्या:

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा

Sushant Singh Case | ‘बॉलिवूडचा ड्रग पेडलर्सशी संबंध नाही’, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

( 4 Bollywood industry Assns & 34 leading Bollywood producers against tv channels goes to Delhi High court)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.