गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम आश्रमात पोलीस अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी

सेवाग्राम आश्रम परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून आश्रमाची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी श्वान पथकासह आश्रमाच्या प्रत्येक भागाची कसून तपासणी केली (Bomb squad inspect Sevagram Ashram amid Gandhi Jayanti program).

गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम आश्रमात पोलीस अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 4:53 PM

वर्धा : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती समारोहानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आज (1 ऑक्टोबर) सेवाग्राम आश्रम परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून आश्रमाची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी श्वान पथकासह आश्रमाच्या प्रत्येक भागाची कसून तपासणी केली (Bomb squad inspect Sevagram Ashram amid Gandhi Jayanti program).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सेवाग्राम आश्रमाचं निर्जंतुकीकरणही करण्यात आलं. मागील 5 महिन्यांपासून कोरोनामुळे हा गांधी आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आश्रम उघडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

सेवाग्राम आश्रमाकडून गांधींजींच्या बनारस विद्यापीठातील पहिल्या भाषणाच्या प्रति वाटप

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गांधी जयंती साजरी केली जाणार आहे. सेवाग्राम म्हणजे महात्मा गांधींची कर्मभूमी. या भूमीत गांधी जयंती म्हणजे विचारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. यंदा कोरोनाचा सावट असल्याने मास्क आणि शारीरिक अंतर ठेवून साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला कोणाही मार्गदर्शकाला बोलवण्यात आलेलं नाही. पण, सेवाग्राम गावात गांधींजींच्या बनारस विद्यापीठातील पहिल्या भाषणाच्या प्रतींचं वाटप आणि वाचन होणार आहे.

महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील आश्रमात मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या टाळेबंदीपासून अजूनही आश्रम बंद आहे. 151 वी जयंती साजरी होत असताना आश्रमाच्या परंपरेनुसार पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी नई तालिम शाळेच्या घंटा घरातून प्रार्थनेला सुरुवात होणार आहे. सकाळी 6 वाजता बापुकुटी समोर प्रार्थना होईल. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत अखंड सूत यज्ञ केले जाणार आहे. या सूत यज्ञावेळी भजन कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी 9 वाजता ‘वैष्णव जण तो’ हे भजन गायले जाणार आहे. याला पालकमंत्री सुनील केदार देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी गांधी विचारक शाळकरी विद्यार्थ्यांना जयंतीदिनी मार्गदर्शन करतात. पण, यंदा याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणालाही बोलावण्यात आले नाही. या उलट फिजीकल डिस्टन्स पाळत मास्क घालून जयंती साजरी केली जाणार आहे. दिवसभर भजन कीर्तन आणि सायंकाळी प्रार्थनेने दिवसाचा शेवट केला जाईल.

हेही वाचा :

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

Bhagat Singh Koshyari | स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा आणि आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न : राज्यपाल

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांचा राजीनामा

Bomb squad inspect Sevagram Ashram amid Gandhi Jayanti program

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.