“कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपलेला नाही”, लसीकरणाचं मोठं आव्हान: बोरिस जॉनसन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लसीला मंजुरी दिली असली तरी कोरोना विरुद्धचा संघर्ष संपला नसल्याचे वक्तव्य केलं आहे Boris Johnson Corona Vaccine
लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपला नसल्याचे वक्तव्य केलं आहे. कोरोलना लसीला मंजुरी दिली असली तरी लसीकरणाचं मोठं आव्हान समोर असल्याची जाणीव त्यांनी देशवासियांना करुन दिली. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ब्रिटनच्या सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. (Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)
बोरिस जॉनसन यांनी लसीचा साठा -70 डिग्री सेल्सिअस तापमानाला लस साठवली जात आहे. एका व्यक्तीला दोन वेळा लस देणे आवश्यक आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये कोरोना लसीचे दोनदा द्यावी लागणार आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी कित्येक महिने लागतील, असं बोरिस जॉनसन यांनी सांगितले.
It’s vital that we are not carried away with over-optimism or fall into the naive belief that the struggle is over. Today, in England, we have ended national restrictions, opening up significant parts of the economy: UK PM Boris Johnson on vaccination https://t.co/S0QqEIuHVa
— ANI (@ANI) December 2, 2020
अति-आशावादी राहू नका
बोरिस जॉनसन यांनी कोरोना लसीबाबत अति-आशावाद बाळगू नये, असे सांगतिले. कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर आपला संघर्ष संपला आहे, असं समजू नये,असं आवाहन ब्रिटनच्या नागरिकांना केले आहे. ब्रिटनमधील लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या क्षेत्रांना खुलं करण्यात आलं आहे, असंही जॉनसन यांनी सांगितले.
MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत. (Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)
भारतात पंतप्रधान मोदींकडून लसीचा आढावा
भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.(Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)
संबंधित बातम्या :
अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपूर्वी? अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात दावा
(Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)