गर्दुल्यांना चाप, पुणे रेल्वे स्थानकावर आता बाऊन्सर तैनात

पुणे : आतापर्यंत आपण बाऊन्सर डान्सबार, पब आणि एखाद्या अभिनेत्याच्या मागे फिरताना पाहिलेत. मात्र आता हे बाऊन्सर पुणे रेल्वे स्थानकावरही दिसतील. रेल्वे प्रशासन आणि बीव्हीजी गृपचा बाऊन्सर आणि हाऊस कीपिंगचा करार झालाय. राज्यात प्रथमच पुण्यात या कराराची अंमलबजावणी झाली आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास आणि स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. हल्ली बाऊन्सर बाळगणं […]

गर्दुल्यांना चाप, पुणे रेल्वे स्थानकावर आता बाऊन्सर तैनात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे : आतापर्यंत आपण बाऊन्सर डान्सबार, पब आणि एखाद्या अभिनेत्याच्या मागे फिरताना पाहिलेत. मात्र आता हे बाऊन्सर पुणे रेल्वे स्थानकावरही दिसतील. रेल्वे प्रशासन आणि बीव्हीजी गृपचा बाऊन्सर आणि हाऊस कीपिंगचा करार झालाय. राज्यात प्रथमच पुण्यात या कराराची अंमलबजावणी झाली आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास आणि स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.

हल्ली बाऊन्सर बाळगणं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. लग्न, वाढदिवस, राजकीय सभा आणि नेत्या-अभिनेत्याच्या मागेपुढे बाऊन्सरचं कडं असतं. फुगलेले बाहू, पिळदार शरीराचा बाऊन्सर आता चोहीकडे दिसतो. पुणे रेल्वेस्थानकावरही आता बाऊन्सर तैनात करण्यात आलेत. बाऊन्सरमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांवरील ताण कमी होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकात चार बाऊन्सर तैनात करण्यात आलेत. दिवस आणि रात्रपाळीत हे बाऊन्सर कार्यरत असतात. गर्दी नियंत्रण, गर्दीत रस्ता मोकळा करणं, स्थानकावरील गर्दुले, मद्यपींना आळा घालणं, स्थानकावर झोपणाऱ्यांना हटवण्याची जबाबदारी बाऊन्सरवर आहे.

इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बीव्हीजीत या संदर्भात करार झालाय. करारानुसार बाऊन्सर बरोबरच हाऊस कीपिंगचं कामही बीव्हीजीकडे सोपवलंय. केटरिंग, पार्किंग, स्थानकाची साफसफाई केली जात आहे. यामुळे सुरक्षा आणि तिकिटावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली आहे. मात्र हे खासगीकरण नसून आऊटसोर्सिंग असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.

रेल्वे स्थानकावर बीव्हीजीचे कर्मचारी सफाईचं काम करतात, तर बाऊन्सर गर्दुले आणि मद्यपींना हाटवतायत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराचा बकालपणा दूर झालाय. परिसरात स्वच्छता पहायला मिळते. इतर स्थानकांच्या तुलनेत पुणे रेल्वे स्थानक स्वच्छ असल्याचं प्रवासी सांगतात.

देशभरातील रेल्वे स्थानकं अस्वच्छतेचे आगार बनलेत. अस्वच्छता आणि दुर्गंधीने नाक दाबून रेल्वेची वाट पहावी लागते. मात्र पुणे रेल्वे स्थानक याला अपवाद आहे. सगळीकडे स्वच्छता पाहायला मिळत असल्याने प्रवास सुखकर आणि आनंदमय होतोय.

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.