17 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने वार, आरोपी तरुणाची आत्महत्या

एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला करत स्वत: आत्महत्या (boy attack on girl yavatmal) केली आहे.

17 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने वार, आरोपी तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 10:51 AM

यवतमाळ : एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला करत स्वत: आत्महत्या (boy attack on girl yavatmal) केली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील येरमल हेटी गावात घडली आहे. गोलू उर्फ अंकुश चव्हाण असं या आरोपीचे नाव (boy attack on girl yavatmal) आहे.

तरुणी घरी एकटी असल्याचे पाहून तरुणाने घरात शिरून तिचे तोंड दाबून गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करीत तिला लोटून दिले. त्यानंतर घराचे दार बाहेरून बंद करून तो पसार झाला होता. या दरम्यान पाण्याची बॅरल वितरीत करणारा विक्रेता तरुणीच्या घरी आला असता त्याने बंद दार उघडताच तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

या घटनेची माहिती त्याने तरुणच्या कुटुंबियांना दिल्यानंतर जखमी तरुणीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले असता केळझरा तांडा जवळील विहिरीत या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, तरुणाने हा हल्ला का केला याचा शोध पोलीस घेत आहेत. जखमी तरुणी पुणे येथे बारावीचे शिक्षण घेत असून ती होळी सणानिमित्त गावी आली होती. यावर आर्णी पोलीस पुढील तपास करत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.