Pandharpur Corona | जपानवरुन पंढरपुरात आलेला चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह

जपानवरुन आलेल्या पंढरपुरातील दोन वर्षाच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली आहे. (Japan return Pandharpur boy corona) त्यामुळे परिसर सील केला आहे.

Pandharpur Corona | जपानवरुन पंढरपुरात आलेला चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 1:44 PM

सोलापूर : पंढरपूर शहर आणि तालुका कोरोनामुक्त झालेला असतानाच पुन्हा एक नवा रुग्ण सापडला आहे. (Japan return Pandharpur boy corona) जपानवरुन आलेल्या पंढरपुरातील दोन वर्षाच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा नवा रुग्ण सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खबरादरीसाठी प्रशासनाने तातडीने पंढरपूर शहरातील भक्तीमार्ग येथील घनःशाम सोसायटीचा परिसर सील केला आहे.

ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. पंढरपुरातील एक दाम्पत्य नोकरीच्या निमित्ताने जपानमधील टोकियो शहरात स्थायिक झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन भारतात आले. ते मूळचे पंढरपूरचे असल्याने त्यांना सोलापुरात क्वारंटाईन केले होते. त्याचवेळी आई,वडील आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे स्वॅब घेतले होते. (Japan return Pandharpur boy corona)

तपासणीमध्ये दोन वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला. तर आई-वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संबंधित कोरोनाबाधित चिमुकल्यावर वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींना अति जोखमी खाली क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1611 वर पोहोचली असून, आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झाला आहे. 665 रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत 814 जण उपचाराअंती घरी परतले आहेत. कोविड हॉस्पिटलमधील 25 टक्के बेड महात्मा फुले जीवनदायी योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच 

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर (Total Corona Patients In Maharashtra) राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होत चालली आहे. काल राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या पार गेला आहे. काल दिवसभरात तब्बल 3 हजार 493 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1 लाख 1 हजार 141 वर (Total Corona Patients In Maharashtra) पोहोचली आहे.

(Japan return Pandharpur boy corona)

संबंधित बातम्या 

Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.