[svt-event title=”महाराष्ट्रात आज कोरोनाचे 1 हजार 26 नवे रुग्ण” date=”12/05/2020,11:07PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाचे 1 हजार 26 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 427, राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 53 बळी, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 921 जणांचा मृत्यू
#BREAKING : महाराष्ट्रात आज कोरोनाचे 1 हजार 26 नवे रुग्ण,
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 427, राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 53 बळी, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 921 जणांचा मृत्यू #CoronaInMaharashtra pic.twitter.com/lSWMOsBt8W— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2020
[svt-event title=”महाराष्ट्रात दिवसभरात 587 रुग्णांची कोरोनावर मात, राज्यात एकूण 5,000 रुग्णांना डिस्चार्ज” date=”12/05/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]
Breaking : राज्यात दिवसभरात 587 रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 5 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले, उपचारात महत्वाच्या दुवा ठरणाऱ्या परिचारिकांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन pic.twitter.com/4DGHW4hcZ0
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2020
[svt-event title=”कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारु नका, मुख्यमंत्र्यांच्या खासगी रुग्णालयांना सूचना” date=”12/05/2020,4:03PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारु नये, खाजगी हॉस्पिटल्सनी जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करुन द्याव्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खाजगी हॉस्पिटल्सच्या संचालकांना सूचना, खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खाजगी हॉस्पिटल्सच्या संचालकांसोबत बैठक, शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत पार पडली बैठक, हिंदुजा, लिलावती, नानावटी, सैफी, बॉम्बे अशा मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सचे संचालक बैठकीला उपस्थित, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित, प्रशासकीय अधिकारीही उपस्थित
[svt-event title=”शहापूरकरांना मोठा दिलासा, 2 रुग्णांची कोरोनावर मात” date=”12/05/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] शहापूरकरांना मोठा दिलासा, 2 रुग्णांची कोरोनावर मात, मुंबई महापालिकेत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण, अखेर कोरोनाविरोधातील झुंज यशस्वी, दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट कोरोना निगेटव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज [/svt-event]
[svt-event title=”राज्यातील जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार” date=”12/05/2020,1:11PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 48 जेलमध्ये एकूण 35 हजार 239 कैदी आहेत. यापैकी 50 टक्के कैद्यांना सोडण्यात येणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 300 च्या वर ” date=”12/05/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 300 च्या वर पोहोचली आहे. आज दोन संशयितांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 96 रुग्णांनी केली कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद ” date=”12/05/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद करण्यात येत आहे. जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या केम्ब्रिज चौकात नोंद सुरू आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची वेगवेगळी नोंद केली जात आहे. रेड झोनमधून येणाऱ्या आणि तापमान अधिक असणाऱ्या लोकांना थेट रुग्णालयात पाठवले जात आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुणे, नाशिक महामार्गावरील हॉटेल आणि धाबे सुरु” date=”12/05/2020,1:02PM” class=”svt-cd-green” ] पुणे, नाशिक महामार्गावरील हॉटेल आणि धाबे सुरु करण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातील सोळा हॉटेल सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील चालक वाहकांना हॉटेलमध्ये जेवण मिळणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांवर आता गावातील तरुणांचा वॉच” date=”12/05/2020,12:59PM” class=”svt-cd-green” ] कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांवर आता गावातील तरुणांचा वॉच राहणार आहे. चाकरमान्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आथा गाव-वाडी स्तरावर तरुणांचे कृती दल तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. कोकणात मुंबई, पुणेहून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. [/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वा देशाला संबोधित करणार” date=”12/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वा देशाला संबोधित करणार pic.twitter.com/tBdP3EnnQd
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2020
[svt-event title=”राज्यातील जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडण्याचा निर्णय” date=”12/05/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडण्याचा निर्णय, राज्यातील 48 जेलमध्ये तब्बल 35 हजार 239 कैदी, यापैकी 50 टक्के आरोपी, कैदी यांना सोडणार, राज्याच्या हायपॉवर कमिटीचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतून 5 श्रमिक एक्स्प्रेस सुटणार, हजारो परप्रांतिय मजूर रवाना होणार ” date=”12/05/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावरुन आज विविध राज्यात श्रमिक एक्स्प्रेस सुटणार आहेत. यासाठी हजारो परप्रांतिय मजूर या परिसरात येत आहेत. दिवसभरात सीएसएमटी स्थनकावरुन पाच रेल्वेगाड्या सुटणार आहे. विविध भागात अकून पडलेल्या परप्रांतीय मजूरांची यादी पोलिसांनी तयार केली होती. यादीनुसार पोलिस या मजूरांना रेल्वेस्थानकावर आणून सोडत आहेत. [/svt-event]
[svt-event title=” रत्नागिरीत कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण ” date=”12/05/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत कोरोनाचे आणखी पाच नवे रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 16 पैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 52 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. [/svt-event]
[svt-event title=” पुण्यातील भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर ” date=”12/05/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 38 वर गेला आहे. त्यापाठोपाठ ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात 406 रुग्ण आढळले आहेत. शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी फक्त 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 1800 इतके रुग्ण आहेत. [/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचा कहर सुरु, जिल्ह्यात आणखी पाच नवे रुग्ण ” date=”12/05/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावतीत आतापर्यंत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 84 झाली आहे. 51 पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. [/svt-event]
[svt-event title=” लॉकडाऊनमध्ये कामगारांच्या आयुक्तांकडे 1165 तक्रारी ” date=”12/05/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमध्ये कामगारांनी कामगार आयुक्तांकडे तब्बल 1165 तक्रारी केल्या आहेत. जेवण, अन्नधान्य मिळत नसल्याच्या तक्रारी 38 हजार 771 कामगारांनी आयुक्तांकडे केल्या आहेत. या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=” पुण्यात दारु खरेदीसाठी ई टोकन” date=”12/05/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात दारु खरेदीसाठी ई टोकनची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. दारु दुकानावरील गर्दी टाळण्यासाठी ई टोकनची सुविधा चालू केली जाणार आहे. ग्राहकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन टोकन मिळणार आहे. ग्राहकांना घराच्या जवळच्या दुकानांची यादी वेबसाईट असणार आहे. ग्राहकाच्यावेळेनुसार दारू आणता येणार आहे. [/svt-event]
[svt-event title=” कोरोनाबाधित रुग्णांना दाखल न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार” date=”12/05/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाबाधित आणि कोरोना संशयित रुग्णांना दाखल न करुन घेणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार, असं धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी सांगितले. रुग्णालयात 24 तास सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करावी. 85 हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कोरोना बाधित, कोरोना संशयित रुग्णांवर मोफत उपचार करावेत. जादा शुल्क आकारल्यास देखील कारवाई होणार, असंही आयुक्तांनी सांगितले. [/svt-event]
[svt-event title=”औरंगबादमध्ये करोनाचा धुमाकूळ, 24 जणांना कोरोनाची लागण” date=”12/05/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत एकूण 651 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डॉ. महेश लड्डा यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=” विरारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची कोरोनावर मात ” date=”12/05/2020,9:03AM” class=”svt-cd-green” ] विरारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी कोरोनावर मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये 82 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरुष आणि 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण विरार पूर्व महाराजा कॉम्प्लेक्समधील राहणारे आहेत. घरातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर हायरिस्कमधून या सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. [/svt-event]
[svt-event title=” कराडमध्ये आणखी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ” date=”12/05/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ] कराडमध्ये आणखी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. कराड तालुक्यातील रूग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 121 झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=” आठ दिवसात पुण्यातून परराज्यात 23 रेल्वे सोडणार ” date=”12/05/2020,8:53AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमध्ये येत्या आठ दिवसात पुण्यातून परराज्यात एकूण 23 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी रेल्वे सोडली जाणार आहे. पुण्यात एक लाख आठ हजार 608 कामगार, मजूर अडकले आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरांचल, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये रेल्वे सोडली जाणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”12/05/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ]