दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप
नवी मुंबईत बिल्डरच्या पत्नीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवत घरफोडीचा बनाव (Accused burglary in own house Navi Mumbai) केला.
नवी मुंबई : नवी मुंबईत बिल्डरच्या पत्नीने कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवत घरफोडीचा बनाव (Accused burglary in own house Navi Mumbai) केला. घरफोडी झाल्याने पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला असता घरफोडी तक्रारदाराच्या पत्नीनेच केल्याचे समोर आले. ही घटना नवी मुंबईत कोपर खैराणेयेथील बोनकडेमध्ये (Accused burglary in own house Navi Mumbai) घडली.
तक्रारदार हा बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहे. बिल्डरच्या पत्नीवर कर्ज होते. ते फेडण्यासाठी तिने पतीच्या नकळत घरातील दागिने गहाण ठेवले आणि त्याच रकमेतून स्वत:वरील कर्ज फेडले.
बंद घराच्या खिडकीतून आत घुसून चोरट्यांनी घरफोडी केल्याची तक्रार बोनकोडे येथे राहणाऱ्या बिल्डरने कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वसीम शेख यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता, सदर गुन्हा घडलेलाच नसल्याचे समोर आले.
फिर्यादी हा बिल्डर असून त्यांच्या पत्नीने परस्पर दागिने गहाण ठेवले. बदल्यात रक्कम मिळवून आणि इतर रकमेतून तिने स्वत:वरील कर्ज फेडल्याची कबुली दिली. तर पतीपासून लपवण्यासाठी घरात चोरी झाल्याचा बनाव केला. पोलिसांना गुन्हा घडल्याचा पुरावा आढळला नाही. त्यावरून कुटुंबातील व्यक्तीवरच संशय आल्याने उलट चौकशीत हा प्रकार उघड झाला.
संबंधित बातम्या :
Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या
हनुवटीखाली झाडलेली गोळी डोक्यातून आरपार, हिंगोलीत आयुध विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या