पुण्यात पाकिस्तानचा झेंडा जाळा, लायटर आणि माचिस मोफत
पुणे : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीआरपीएफचे 40 जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाल्याने देशातलं वातावरण तापलंय. सर्वच स्तरावर पाकिस्तानचा निषेध केला जातोय. हिंदू-मुस्लीम मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानचा झेंडा जाळून भारतीयांनी रोष व्यक्त केलाय, तर पुण्यातील […]
पुणे : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीआरपीएफचे 40 जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाल्याने देशातलं वातावरण तापलंय. सर्वच स्तरावर पाकिस्तानचा निषेध केला जातोय. हिंदू-मुस्लीम मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानचा झेंडा जाळून भारतीयांनी रोष व्यक्त केलाय, तर पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडा विक्रेत्याने पाकिस्तानचा झेंडा घ्या, लायटर आणि माचिस मोफत, असा अभिनव उपक्रम राबवलाय. याबाबत फ्लेक्स लावण्यात आलेत. पुणेकरही मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचा झेंडा खरेदी करुन जाळत आहेत.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा रोष व्यक्त करायला नागरिकांकडे मार्ग नाही. त्यामुळे पाकिस्तानचा झेंडा जाळून नागरिकांचा राग बाहेर पडत आहे. तर आमचा राग बाहेर पडण्यासाठी आम्ही मोफत लायटर देत असल्याचं मुरुडकर यांनी सांगितलं.
यावर मुरुडकर म्हणाले, झेंडा जरी पैसे घेऊन विकत असलो तरी नफा मात्र कमवत नाही. दीडशे रुपयाच्या किंमतीपेक्षा कमी दराने विक्री केली जात आहे. जीएसटीही आम्ही भरतोय. यातील पैसा एनजीओ देत असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानचा झेंडा विक्रीतून व्यवसाय करत नसल्याचं ते म्हणाले. तर ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय. ग्राहकांनी तर 42 दिवस एक एक झेंडा जाळणार असल्याचं सांगितलंय.
राज्यभरात विविध ठिकाणी या हल्ल्याच्या निषेधार्थ उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. प्रत्येक जण आपला राग कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त करतोय. पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवा, अशी प्रत्येकाची भावना आहे.
पाहा व्हिडीओ :