उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली आहे. या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते.
देहरादून : उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली. या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा (Student) मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात तिहरी गडवालच्या कनसाळी येथे झाला. या बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते. शाळेत जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत.
Uttarakhand: 7 feared dead after a school bus, carrying 18 children, rolled down a gorge in Kangsali of Tehri Garhwal today. The injured are being taken to a hospital. pic.twitter.com/Gx3HsKsTLl
— ANI (@ANI) August 6, 2019
घटनास्थळी पोहचलेले एनडीआरफचे पथक दरीत कोसळलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. या बचावकार्यात स्थानिकांनीही पोलीस आणि एनडीआरएफ पथकांना मदत करत आहेत.
या बस अपघातात काही विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आहे. मुलांवर सध्या उपचार चालू आहेत. मृत मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या अपघाताची अधिक चौकशी करत आहेत.