पुण्यात कन्टेन्मेंट झोन वगळून आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी
पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आयटी कंपन्या सुरु करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिली (IT Company Pune) आहे.
पुणे : पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आयटी कंपन्या सुरु करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिली (IT Company Pune) आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. काही अटी आणि शर्तीनुसार कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली (IT Company Pune) आहे.
पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली.
पुणे शहरातील मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत.
काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 167 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 2 हजार 552 रुग्ण कोरोनातून बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 212 इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 257 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर
Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या पार, 2 हजार 927 रुग्णांना डिस्चार्ज