By Election Result 2020 LIVE: देशातील 11 राज्यांमध्ये पोटनिवडणुकीचा निकाल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
देशात एकिकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. दुसरीकडे याचवेळी देशातील 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर होत आहे.
नवी दिल्ली : देशात एकिकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. दुसरीकडे याचवेळी देशातील 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर होत आहे. यात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह आणखी 8 इतर राज्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर, गुजरात 8, उत्तर प्रदेश 7, मणिपूर 5, नागालँड 2, ओडिशा 2, झारखंड 2, कर्नाटक 2, हरियाणा 1, तेलंगाणा 1, छत्तीसगड 1 जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे बिहारसोबतच या ठिकाणी देखील कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (By Election Result 2020 LIVE Madhya Pradesh Gujrat Uttar Pradesh Manipur Karnataka).
मध्य प्रदेश
विशेष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये या पोटनिवडणुकीच्या निकालावरच भाजपचं शिवराज सिंह सरकार राहणार की पडणार हे ठरणार आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष याकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. या 28 जागांवर एकूण 355 उमेदवार मैदानात आहेत. यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय बसपाने देखील सर्व 28 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय सपाने 14 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या पोटनिवडणूक निकालाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमधील 28 पैकी 20 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसला 7 जागांवर तर अन्यला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
गुजरात
गुजरातमध्ये पोटनिवडणुकीतील 8 पैकी सर्वच्या सर्व 8 जागांवर भाजपचं आघाडीवर आहे. काँग्रेससह इतर पक्षांना आपलं खातंही उघडता आलेलं नाही.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील 7 पैकी 6 जागांवर भाजपने आघाडी घेतलीय. एका जागेवर अन्य पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे.
मणिपूर
मणिपूरमध्ये भाजप 4 जागांवर, अन्य पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत.
11 राज्यांमधील पोटनिवडणुकीची अद्ययावत आकडेवारी
राज्य | भाजप | काँग्रेस | अन्य |
---|---|---|---|
मध्य प्रदेश (28) | 20 | 7 | 1 |
गुजरात (8) | 8 | 0 | - |
उत्तर प्रदेश (7) | 6 | 0 | 1 |
मणिपूर (5) | 4 | 0 | 1 |
नागालँड (2) | 0 | 0 | 2 |
ओडिशा (2) | 0 | 0 | 2 |
झारखंड (2) | 0 | 1 | 1 |
कर्नाटक (2) | 2 | 0 | - |
हरियाणा (1) | 0 | 1 | - |
तेलंगाणा (1) | 1 | 0 | - |
छत्तीसगड (1) | 0 | 1 | - |
संबंधित बातम्या :
By Election Result 2020 LIVE Madhya Pradesh Gujrat Uttar Pradesh Manipur Karnataka