राम विलास पासवानांच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक, रिंगणात कोण उतरणार?

मोदी सरकारमध्ये पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

राम विलास पासवानांच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक, रिंगणात कोण उतरणार?
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 11:44 AM

नवी दिल्ली : लोक जनशक्ति पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 14 डिसेंबरला या जागेसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पासवान यांच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. (Bypoll to Rajya Sabha Seat on December 14 Vacated Due to Ram Vilas Paswan Death)

लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अनेकदा राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसतात. विशेषतः दिवंगत नेत्याच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाल्यास मतभेद विसरुन बिनविरोध निवडणूक घेण्याची परंपरा देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली आहे.

राम विलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याआधी ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

रामविलास पासवान यांचे राज्यसभा सदस्यत्व 2 एप्रिल 2024 पर्यंत होते. त्यांच्या जागी निवडून येणाऱ्या खासदाराला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

राम विलास पासवान यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची हाजीपूरची जागा धाकटे बंधू पशुपती कुमार पारस यांना दिली होती. त्यानंतर ते राज्यसभेवरुन संसदेत गेले. भाजपचे रवी शंकर प्रसाद लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेली जागा भाजपने मित्रपक्ष लोजपला दिली होती. मोदी सरकारमध्ये पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

राजदसोबत 2014 मध्ये फारकत घेतल्यानंतर पासवान भाजपसोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी स्थानिक एनडीए आघाडीतून काढता पाय घेतला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी नितीश कुमार आणि जेडीयूवर हल्लाबोल चढवला होता. (Bypoll to Rajya Sabha Seat on December 14 Vacated Due to Ram Vilas Paswan Death)

बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी भाजपविरोधात उमेदवार दिले नव्हते. लोजपची एकच जागा निवडून आली असली, तरी त्यांचा फटका जेडीयूला बसला. पर्यायाने भाजप बिहारमध्ये ‘बडे भैया’ झाला. एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचा वरचष्मा राहिला. याची परतफेड म्हणून चिराग पासवान यांच्या पक्षातील नेत्याला राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या:

Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?

“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिरागवर संशय” मांझींच्या पक्षाचं पंतप्रधानांना पत्र

(Bypoll to Rajya Sabha Seat on December 14 Vacated Due to Ram Vilas Paswan Death)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.