‘बाबासाहेब पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा’

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा, अशी मागणी भीम आर्मीने केली. भीम आर्मीने आज पुण्यातील बेलबाग चौकात निदर्शनं करुन बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत, भीम आर्मीने ही मागणी केली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण […]

'बाबासाहेब पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा, अशी मागणी भीम आर्मीने केली. भीम आर्मीने आज पुण्यातील बेलबाग चौकात निदर्शनं करुन बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत, भीम आर्मीने ही मागणी केली.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने संताप व्यक्त केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला होता. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारालाही विरोध दर्शवला.

बाबासाहेब पुरंदरेंना विरोध का? बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि जीवनावर वादग्रस्त लिखाण केलं आहे. तसेच त्यांच्यावर हा पण आरोप आहे की, त्यांनी शिवाजींचे गुरु समजले जाणारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.

कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे? बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे. फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरसाकर दिला होता.

पद्म पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (मरणोत्तर), शंकर महादेवन, प्रभूदेवा, फुटबॉलपटू सनील छेत्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह 94 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या रत्नांचाच दबदबा दिसला. कारण, 112 नावांमध्ये तब्बल 12 नावं महाराष्ट्राची आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. विशेष म्हणजे ज्या चार जणांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आलाय, त्यामध्ये दोन जण महाराष्ट्रातले आहेत. अनिल कुमार नाईक आणि बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण जाहीर झाला.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातल्या या 12 जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री  

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार  

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.