प्रसिद्ध अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा
'फीर लौट आयी नागिन' आणि 'राम सिया के लव कुश' फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : ‘फीर लौट आयी नागिन’ आणि ‘राम सिया के लव कुश’ फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case Of Molestation). अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शाहबाज खानवर आहे (Actor Shahbaz Khan). या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai: Case of molestation filed against actor Shahbaz Khan at Oshiwara Police Station. FIR registered under IPC sec 354 (Assault or criminal force to woman with intent to outrage her modesty) & 509 (Word, gesture or act intended to insult modesty of a woman). Investigation on.
— ANI (@ANI) February 12, 2020
शाहबाज खान यांनी चंद्रकांता, युग, अफसर बिटिया, कर्मफल दाता शनि, द ग्रेट मराठा सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकतेच ते ‘तेनाली रामा’, ‘राम सिया के लव कुश’ आणि ‘दास्तान-ए-मोहोब्बत सलीम अनारकली’ या मालिकांमध्ये झळकले.
मालिकांसोबतच शाहबाज खान यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. त्यांनी महानायाक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मेजर साहब’ चित्रपटात काम केलं आहे. तर अभिनेता सैफ अली खानसोबत ‘एजंट विनोद’, सनी देओलच्या ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ स्पाय’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.