छापा टाकण्यासाठी गेलेले सीबीआयचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात
कोलकाता : पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा अजब प्रकार कोलकात्यात घडला आहे. त्यामुळे सध्या कोलकात्यात सीबीआय विरुद्ध पोलीस असे चित्र बघायला मिळत आहे. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी शारदा चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महापौर […]
कोलकाता : पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा अजब प्रकार कोलकात्यात घडला आहे. त्यामुळे सध्या कोलकात्यात सीबीआय विरुद्ध पोलीस असे चित्र बघायला मिळत आहे. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी शारदा चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महापौर फिरहाद हकीम हे पोलीस आयुक्तांच्या घरी जाऊन याबाबत चर्चा केली, त्यांच्यामते हे सर्व पंतप्रधान मोदींचे षडयंत्र आहे.
West Bengal: Police detains the CBI team which had reached the residence of Kolkata Police Commissioner Rajeev Kumar. The team has now been taken to a police station. pic.twitter.com/YXJJ3d11LL
— ANI (@ANI) February 3, 2019
काहीच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश सरकारने परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मनाई केली होती. मात्र आता चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक केल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या टीमला सध्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तसेच, कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या कार्यालयाला वेढा घातला असून मोठा पोलीस फौजफाटा तेथे तैनात करण्यात आला आहे.
The Kolkata Police Commissioner is among the best in the world. His integrity, bravery and honesty are unquestioned. He is working 24×7, and was on leave for only one day recently. When you spread lies, the lies will always remain lies 2/2
— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 3, 2019
रविवारी सायंकाळी सीबीआयचे अधिकारी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले, मात्र त्यांना बाहेरच अडवण्यात आले. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाइल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती, मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. दुसरीकडे, अधिकाऱ्यांजवळ वॉरंट नव्हता म्हणून त्यांना थांबवण्ययात आल्याचे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
Chit fund case: Visuals from outside the residence of Kolkata Police Commissioner Rajeev Kumar. A CBI team is present at the spot. #WestBengal pic.twitter.com/2nvzbStFa0
— ANI (@ANI) February 3, 2019
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, संपूर्ण देश मोदी-शाहांमुळे त्रस्त आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. मोदी सरकारच्या या वृत्ती विरोधात त्यांनी धरणे आंदेलन करण्याचा इशाराही दिला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर राज्यात न उतरवण्याचा पवित्राच जणू राज्य सरकारने घेतला आहे. पोलीस प्रशासनाला पुढे करत राज्य सरकारने भाजपच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर राज्यात उतरवण्यास नकार दिला. आधी अमित शाह यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास मनाई करण्यात आली, त्यानंतर रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सध्या केंद्र सरकार आणि पंश्चिम बंगाल सरकारमधील वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.