Marathi News Latest news Celebration of international yoga day by indian soldiers from siachen to srinagar
International Yoga Day Photos: भारतीय जवानांचा 18 हजार फूट उंचीवर योगाभ्यास
भारतीय जवानांनी लडाखमध्ये बर्फाने झाकलेल्या हिमालयात 18,800 फूट उंचीवर योग केला (Celebration of international yoga day by Indian Soldiers ).
Follow us
इंडो तिबेटीअर बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) जवानांनी आज (रविवार, 21 जून) सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लडाखमध्ये बर्फाने झाकलेल्या हिमालयात 18,800 फूट उंचीवर योग केला. देशातील सर्वात उंचीच्या आणि दूरच्या भागात भारतीय योद्ध्यांचे योगासन करतानाचा फोटो देखील समोर आले आहेत. यात आजूबाजूला खडतर परिस्थिती असतानाही भारतीय जवान योगाभ्यास करताना दिसत आहेत.
भारतीय जवानांनी सिक्किम हिमालयामध्ये 18,800 फूट उंचीपासून ते लडाखमध्ये खारदुंगपर्यंत 14,000 फूट उंचीवरही योगासने केली (Celebration of international yoga day by Indian Soldiers).
या हिमवीरांनी हिमालयात वेगवेगळ्या उंचीवर खडतर परिस्थितीत आपली तंदुरुस्ती दाखवत योगासन केलं.
भारतीय जवानांनी जेथे शक्य होईल तेथे जागा करत कोरोना संसर्गापासून सुरक्षेसाठी मास्क घालत योग केला.
उत्तराखंडमध्ये देखील जवानांनी बद्रीनाथजवळ 14,000 फूट उंचीवर योग केला.
विशेष पर्वतीय दल, आयटीबीपी, लडाखमधील काराकोरमपासून अरुणाचल प्रदेशमधील जाछेपलापर्यंत जवानांनी योग केला.
भारतीय सैन्याच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री (JKLI) बटालियनने श्रीनगरमधील रंगरेथमध्ये योग केला.