मला कळत नाही शरद पवार यांना कोण मारणार?, निलेश राणे यांची टीका; भाजपला घरचा आहेर?

राज्यातील बुजुर्ग नेते शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरविली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना अभिनेत्री कंगणा राणावत यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. त्यानंतर केंद्राने तिला सुरक्षा पुरविली होती...यावर भाजपा नेते निलेश राणे संतापले आहेत.

मला कळत नाही शरद पवार यांना कोण मारणार?, निलेश राणे यांची टीका; भाजपला घरचा आहेर?
Nilesh Rane and Sharad Pawar
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 8:20 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकार झेड प्लस सुरक्षा पुरविणार आहे. आगामी काळ निवडणूकांचा आहे. राजकीय क्षितिजावर शरद पवार हे जुन्या पिढीचे नेते आपल्या घरातच फूट पडल्याने पुन्हा आपल्या पक्षाची पत मिळविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा असताना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी चर्चाविनिय करीत त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करीत टिका केली आहे. मला कळत नाही शरद पवार यांना कोण मारणार आहे ? असा सवाल करीत निलेश राणे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा पुरविली आहे. यासंदर्भात आढावा घेण्यात येऊन त्यांच्या दिमतीला मोठा फौजफाटा नेमण्यात आला आहे.शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास स्थानी या संदर्भात सीआरपीएफचे अधिकारी आले होते. त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना केंद्रीय सुरक्षा पुरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यास शरद पवार यांनी स्वीकारल्याचे म्हटले जात आहे. एसटी संपाच्या वेळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत हा निर्णय घेतला गेला आहे.

काय आहे नेमकी पोस्ट –

आयुष्यात करुन दाखवावं – विद्या चव्हाण

भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 CRPF जवान त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी या ट्वीटला उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की पवार साहेबांना सुरक्षेची नेमकी गरज काय ते निलेश राणे यांनी सांगू नये त्यानी 50 वर्षात केलेल्या कामापैकी किमान थोड तरी आयुष्यात करुन दाखवावं असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.