CBSE दहावीचा निकाल जाहीर, ‘टॉप 100’ मध्ये तिघेजण महाराष्ट्राचे!
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज म्हणजेच सोमवारी 6 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून 17 लाख 74 हजार 299 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 91.10 टक्के […]
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज म्हणजेच सोमवारी 6 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून 17 लाख 74 हजार 299 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 4.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदा सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या निकालात टॉप 100 विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईतील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलमधील अड्री दास या विद्यार्थ्यांने 500 पैकी 497 गुण मिळवत 40 वे स्थान मिळवले आहे. त्यानंतर नवी मुंबईतील नेरुळमधील अपेजय स्कूलमधील (APEEJAY SCHOOL) दिप्सना पांडा या विद्यार्थिनीने 497 गुण मिळवले आहे. दिप्सनाने या यादीत 91 क्रमांक पटकावला आहे. तर 92 क्रमांकावर ठाण्यातील रिलायन्स फाऊंडेशन शाळेतील धत्री कौशल मेहता हा विद्यार्थी आहे. धत्रीला 497 गुण मिळाले आहेत.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019
यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात केरळमधील त्रिवेंद्रम शहराने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम शहराचा निकाल तब्बल 99.85 टक्के इतका लागला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर 99 टक्क्यांसह चेन्नई आणि तिसऱ्या स्थानावर 95.89 टक्क्यांसह अजमेर आहे. या परीक्षेत केरळमधून भावना एन. शिवदास या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. यंदा दहावीच्या एकूण 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. तर 24 विद्यार्थ्यांना 500 पैकी 498 गुण मिळवले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी 3 च्या सुमारास ऑनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना cbse.nic.in , cbseresults.nic.in व results.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहाता येणार आहे. तसेच आयव्हीआर व एसएमएसच्या माध्यमातूनही हा निकाल जाणून घेता येईल. त्याचबरोबर संबंधित शाळांच्या वेबसाइटवरही हा निकाल पाहता येईल, असे ‘सीबीएसई’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.