चीन, पाकिस्तानशी लढण्यासाठी भारताचं मोठं पाऊल, 83 तेजस लढाऊ विमानं खरेदी करणार
केंद्र सरकार 83 तेजस लाढाऊ विमाने (Tejas fighter jet) खरेदी करणार असून त्यासाठी एकूण 48 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (government Tejas fighter jet)
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सुरु असलेला भारत (India) आणि चीनमधील (China) सीमावाद अजूनही संपलेला नाही. या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये अनके बैठका झल्या. मात्र, अजूनही सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. तसेच, भारत पाकिस्तान (Pakistan) नियंत्रण रेषेवरसुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकार 83 तेजस लाढाऊ विमाने (Tejas fighter jet) खरेदी करणार असून त्यासाठी एकूण 48 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (central government approved 43 thousand crore rupees to buy the Tejas fighter jet)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सीमावाद आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकीत युद्ध सज्जता आणि भारतीय वायूसेनेची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीकोनातून 83 तेजस लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. या विमानांची एकूण किंमत 48 हजार कोटी रुपये आहे. ही सर्व विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या भारतीय कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. याविषय़ी बोलताना सरकारने 83 तेसज लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षेच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा.
तेजस लाढाऊ विमानाची विशेषता काय?
भारतीय वायूदलामध्ये 42 स्क्वॉड्रनची गरज आहे. मात्र सध्या फक्त 30 स्क्वॉड्रन उपलब्ध आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये कमीतकमी 18 लढाऊ विमानं असतात. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडून 83 विमानं खरेदी केल्यांनतर वायूदलात आणखी 3 ते 4 स्क्वॉड्रन वाढतील. ज्या तेजस विमानाच्या खरेदीसाठी मंजुरी दिलेली आहे, त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे विमान तयार करण्यासाटी 60 टक्के भारतीय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. तेजसचा वेग प्रतितास 2200 किलोमीटर आहे. म्हणजेच या विमानाचा वेग आवाजाच्या वेगापेत्रक्षा दीड पटीने जास्त आहे. या लढाऊ विमानाची 6560 किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचीसुद्धा या विमानामध्ये क्षमता आहे. तेजसमध्ये लेझर गाईडेड मिसालईल्स असून त्याचा अपयोग शत्रूंचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी करता येऊ शकतो. शत्रूंच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इस्त्रायली रडार यंत्रणासुद्धा तेजसमध्ये आहे.
कितीही बिकट परिस्थिती आली तरी सैन्य तयार
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सीमावाद निवळण्यासाठी चीन आणि भारतामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, अजूनतरी या बैठकांमध्ये काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यानंतर, “देशासमोर कितीही बिकट स्थिती निर्माण झाली तरी त्या संकटाशी सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. सैन्याला लागण्याऱ्या गोष्टी त्यांना पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात आहेत. सैनिकांना कपडे, धान्य यांची कमतरता भासू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे,” असं लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी सांगितलं आहे.
पुणे महापानगरपालिका आता कर्मचाऱ्यांची ‘नशा’ उतरवणार! https://t.co/3vuvs7hv1e @InfoDivPune @mohol_murlidhar @CMOMaharashtra @NGOMuktangan @supriya_sule @AjitPawarSpeaks #detoxification #Pune #PMC #muktangan #vyasanmukti
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2021
संबंधित बातम्या :
चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ, नौदलाला देणार शक्तिशाली बंदुका
आम्हाला शांतता हवी, पण कोणी डिवचले तर सोडणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा
तिबेटमध्ये चिनी सैनिकांकडून मिलिट्री लॉजिस्टिक हबची निर्मिती, सॅटेलाईट फोटोंतून उघड
(central government approved 43 thousand crore rupees to buy the Tejas fighter jet)