UAPA कायद्याअंतर्गत 18 दहशतवाद्यांची नावं जाहीर, सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन, छोटा शकीलचाही समावेश

UAPA कायद्या अंतर्गत केंद्र सरकारनं १८ नव्या दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहेत. त्यात मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवरील दहशतवादी हल्ला, तसंच मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचा समावेश करण्यात आला आहे.

UAPA कायद्याअंतर्गत 18 दहशतवाद्यांची नावं जाहीर, सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन, छोटा शकीलचाही समावेश
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 5:01 PM

नवी दिल्ली: देशात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यात UAPA (unlowful activities prevention act)कायद्याअंतर्गत १८ जणांचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनचाही समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील दहशतवादी हल्ला, संसदेवरील हल्ला आणि अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यात सहभागी दहशतवादांची नावं आहेत. (Central Government announces list of 18 new terrorist under UAPA Act)

केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा युसुफ मुजमिल (26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभाग), हाफिज सईदचा नातेवाईक असलेला अबदुर रहमान मक्की, युसुफ अजहर (कंधान विमान अपहरण), टायगर मेमन (मुंबई साखळी बॉम्बस्फोट) आणि छोटा शकीलच्या नावाचा सहभाग आहे.

काय आहे UAPA कायदा?

लोकसभेत जुलै 2019 मध्ये या कायद्यातील तरतुदींना मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे. यापूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद या कायद्यात होती.

विधेयकातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या तरतुदींना काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोध केला होता. पण या विधेयकाच्या बाजुने 147 तर विरोधात फक्त 42 मतं पडली होती.

सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

250-300 पेक्षा अधिक दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांमध्येच थंडी सुरु होईल. मात्र, आपले जवान या कडाक्याच्या थंडीतही देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी तयार असल्याचं सांगताना मला आनंद होत आहे. आम्ही दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची घुसखोरी करु देणार नाही,” असं विश्वास भारतीय सैन्याचे (Indian Army) लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lieutenant General BS Raju) यांनी व्यक्त केला आहे.

‘शस्त्रं उचलणाऱ्यांवर कारवाई करणार’

“जो शस्त्रं उचलेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हा संदेश आधीही काश्मिरमधील जनतेला दिलेला आहे. तसेच दिशाभूल होऊन शस्त्रास्त्र उचलणाऱ्या कुणालाही परत यायचं असेल तर त्याचाही आम्ही स्वीकार करु. अशाप्रकारे 2-3 लोकांनी आत्मसमर्पणही केलं आहे,” अशी माहिती राजू यांनी दिली.

संबंधित बातम्या: 

‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, भारतीय जवान डाव उधळणार : आर्मी कोअर कमांडर

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

Central Government announces list of 18 new terrorist under UAPA Act

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.