कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारडून जोरदार तयारी सुरु आहे. शासनाने देशातील तसेच परदेशातील व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क सुरु केला आहे.

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 2:20 PM

नवी दिल्ली : देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सर्व गोष्टी उघडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients) संख्याही वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या 91 लाखांच्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर लस (corona vaccine) शोधण्याचं कामही वेगात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरु आहे. लस बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारडून जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. (Central Government Preparing for Corona Vaccine Distribution, Govt discussing with Serum Institute, Bharat Biotech and Modernna)

केंद्र सरकारने कोरोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. प्रामुख्याने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट, मॉडर्ना कंपनी, भारत बायोटेकसोबत संपर्क करुन लसीकरणासंदर्भात प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वदेशी कंपन्यांच्या लसी 90 ते 95 टक्के प्रभावी आहेत. या लसींचा साठा आणि वितरणासंदर्भात केंद्र सरकारकडून प्राथमिक चर्चांना सुरुवात झाली आहे.

लस तयार झाल्यानंतर सर्वात आधी ही लस आरोग्यक्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार असून त्यासाठी यादी तयार करण्यात येत आहे. यासाठी एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ साठवणूक आणि वितरणासाठी भारतातील सीमा आणि समस्यांवर अधिक लक्ष देत आहेत. अनेक राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्याचे काम सुरु झाले आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्राकडून फिरते रेफ्रिजरेटर, कुलर आणि मोठे रेफ्रिजेरेटर तसेच 150 डीप फ्रिजरर्सची व्यवस्था केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर तयार केले जात आहेत.

‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू

कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश आहे. याचं संचालन हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे.

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड’च्या वितरणाला सुरुवात; लशीची किंमत 500 ते 600 रुपये

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (adar poonawalla) यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशील्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ लोकांना ही लस देण्याला प्राधान्य दिले जाईल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. मात्र, केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या लशीची किंमत 225 ते 300 रुपये इतकी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!

(Central Government Preparing for Corona Vaccine Distribution, Govt discussing with Serum Institute, Bharat Biotech and Modernna)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.