केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 9:35 AM

नाशिक : “आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे. म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे (Central Government Stops Onion Export). त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे”, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे (Central Government Stops Onion Export).

“आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो ही कांदा चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिला. त्याला आता समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील”, अशी भीती संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

लासलगावात कांद्याचे दर 3 हजार रुपयांवर जाताच अचानक झालेल्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नऊ वाजता कांद्याचा लिलाव सुरु होणार असल्याने बाजार भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबई,चेन्नई पोर्टवर तसेच बांग्लादेश बॉर्डरवर व्यापाऱ्यांचा वीस हजार मेट्रिक टन कांदा कंटेनर आणि रेल्वे मालगाडीत पडून आहे (Central Government Stops Onion Export).

कांदगा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याने भरलेले 400 कंटेनर मुबंई पोर्टवर उभे आहेत. कुठलीही माहिती न देता मुबई पोर्टवर कांदा निर्यात थांबवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात 500 ते 600 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर कांदा निर्यात पूर्ववत न केल्यास रस्ता रोको, रेल रोको आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे.

कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. 48 तासात निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा नाशिक जिल्ह्यातील टोल बंद करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे व्यापार बंद ठेवण्याचं शेतकरी संघटनांचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत.

लासलगाव बाजार समिती कांद्याचे सोमवारचे बाजार भाव

  • जास्तीतजास्त – 3,209 रुपये
  • सरासरी – 2,801 रुपये
  • कमीतकमी – 1,100 रुपये

Central Government Stops Onion Export

संबंधित बातम्या :

आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.