Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात तिथे मी सीनियर प्रोफेसर होतो, छगन भुजबळ यांचा संजय गायकवाड यांना दोनच शब्दात इशारा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो ' अशा शब्दांत भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना टोला लगावला.

तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात तिथे मी सीनियर प्रोफेसर होतो, छगन भुजबळ यांचा संजय गायकवाड यांना दोनच शब्दात इशारा
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 11:19 AM

नाशिक | 2 फेब्रुवारी 2024 : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करत त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ गायकवाडांची भाषा योग्य नाही. पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो ‘ अशा शब्दांत भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला.

नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतला. ‘ गायकवाड जे बोलले ते मी ऐकलं, ते ऐकून मलाही वाईट वाटलं. त्यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. मला त्यांना फक्त एवढंच सांगायचय, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे ‘ अशा शब्दांत त्यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला.

‘ राहता राहिला त्यांनी वापरलेल्या भाषेचा प्रश्न तर त्याबद्दल त्यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे, ते बघून घेतील. कमरेत लाथ घालून मला बाहेर काढा, अशी भाषा त्यांनी वापरली. मला मंत्रीमंडळात घ्यायचं की नाही बाहेर काढायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्य आहे.

दुसरी जी गोष्ट आहे कमरेथ लाथ घालण्याची , ते काही ते करणार नाहीत, कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरू आहे आनंद दिघे आणि इतर मोठ्या शिवसेना नेत्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे अशी लाथ-बिथ घालणं, अशा प्रकारची भाषा करणं, हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं ‘ असं छगन भुजबळांनी सुनावलं.

काय म्हणाले संजय गायकवाड ?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले होते. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरन बरीच खळबळ माजली. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.

मला कोणत्याही पदाची हौस नाही 

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावरही भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं.  मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. मला आता नवीन काही पाहिजे, असं काही नाही. असं कोणतही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.