सहकारमंत्र्यांच्या स्वागत रॅलीत चेन आणि पाकीट चोरी, तिघांना अटक, 2 लाखाहून अधिक किमतीचे सोनं जप्त
राजकीय रॅलीत कार्यकर्ते बनून सोने आणि पाकीट चोरी करणाऱ्या बीडच्या टोळीला कराड पोलिसांनी गजाआड केलं (minister balasaheb patil welcome rally theft) आहे.
सातारा : राजकीय रॅलीत कार्यकर्ते बनून सोने आणि पाकीट चोरी करणाऱ्या बीडच्या टोळीला कराड पोलिसांनी गजाआड केलं (minister balasaheb patil welcome rally theft) आहे. अबु उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून 2 लाख 13 हजार 500 रुपये किमतीचे सोने आणि 4 हजार रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यातील अजून एका संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.
गेल्या महिन्यात सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची कराड शहरात स्वागत रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत या टोळीने गर्दीचा फायदा घेत लोकांच्या गळ्यातील चेन, पाकीट चोरी केली होती. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.
याबाबत शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराड शहर आणि परिसरातील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यावेळी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती (minister balasaheb patil welcome rally theft) लागले.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी मंत्री पाटील यांच्या स्वागत रॅलीचे काही व्हिडीओ शूटींग पाहिले. त्यावेळी त्यांना तिन्ही आरोपींच्या हालचाली आणि गुन्हा घडलेल्या ठिकाणचे अनेक संशयास्पद फुटेज मिळाले.
यानंतर पोलिसांना हे तिघेही बीड जिल्ह्यातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक पथक तयार केले.
त्यानंतर बीड येथील गांधीनगर येथे जाऊन त्यांनी आपली वेशभूषा बदलून अबु उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर तिघांना अटक केली. या तिघांकडून 2 लाख 13 हजार 500 रूपये किमतीचे सोने आणि 4 हजार रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत (minister balasaheb patil welcome rally theft) केला.