फडणवीस की ठाकरे सरकार, कोणतं सरकार भारी? डॉ. निलेश साबळे म्हणतो….

निलेश साबळे हे सहकुटुंब साई चरणी लीन झाले.  यावेळी निलेश साबळे (Nilesh Sable at Shirdi Sai Baba)  यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर भाष्य केलं.  

फडणवीस की ठाकरे सरकार, कोणतं सरकार भारी? डॉ. निलेश साबळे म्हणतो....
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 7:30 PM

शिर्डी : चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक, अँकर अभिनेते डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable at Shirdi Sai Baba) यांनी आज शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. निलेश साबळे हे सहकुटुंब साई चरणी लीन झाले.  यावेळी निलेश साबळे (Nilesh Sable at Shirdi Sai Baba)  यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर भाष्य केलं.

“मागील आणि आताचे दोन्ही सरकार हे कलाकारांप्रती आस्था असणारं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘चला येऊ द्या’ची क्लिप पाहिल्याशिवाय झोपत नव्हते. तर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आवर्जून कार्यक्रम पाहतात”, असं निलेश साबळे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्रात नवा प्रयोग आहे. राजकारणातील तीन शक्ती आता एकत्र आल्या असून काहीतरी वेगळं घडेल ही अपेक्षा आहे, असं निलेश साबळेंनी नमूद केलं.

साईबाबांचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करायला आलो आहे. बाबांचे दर्शन घेतल्यावर स्फूर्ती मिळते. वर्षभर काम करण्याची ताकद आणि हसविण्याचं ज्ञान साईमुळे मिळते. म्हणूनच साईंचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असं निलेश साबळेंनी सांगितलं.

झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या ही विनोदी मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

निलेश साबळे हे या कार्यक्रमाचे अँकरिंग करतात, तर भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यासारखे कलाकार आपली कला सादर करुन, प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.