नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी आज (बुधवारी) सकाळी अटक केली. या अटकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध व्यक्त करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. तसंच अर्णवच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant patil Criticized Uddhav Thackeray Government over Arnab Goswami Arrest)
ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप करत हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीचं आहे. ती फाईल देखील बंद झाली होती मात्र सरकार अर्णव यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी काहीतरी कारण शोधत होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणीबाणीप्रमाणे काहीही केलं तरी चालेल, या भ्रमात सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी राहू नये, असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला तसंच नाईक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांना आज ज्याप्रकारे अटक झाली आहे ते निषेधार्ह आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मिठाघर केंद्राची प्रॉपर्टी
मिठाघर हे केंद्राची प्रॉपर्टी आहे. कांजूरमार्गच्या जागेवर केस सुरु आहे. मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी बिल्डिंग उभी करण महागात पडणार आहे. याप्रकरणी सरकर घटना, नियम पाळत नाही वा समजून घेत नाही. याप्रकरणी बाफना नावाचे आमदारांच्या पुत्रांनी यातील काही जमिनीवर क्लेम केला होता. तो महसुलने फेटाळला. ते हायकोर्टात गेले. इथल्या सगळ्या जागेच्या हस्तांतरावर स्टे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2015 ला कार शेड करण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाने 3700 कोटी भरायला सांगितले ते परवडणारे नव्हते. त्यावेळी मिठागर आयुक्त कोर्टात गेले होते, असं पाटील यांनी सांगितलं.
सरकारकडून शिक्षणाचा खेळ सुरु
कसले तरी अनावश्यक विषय आणून महत्त्वाच्या विषयांना बगल देण्याचं काम सरकारकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून सुरु आहे. कोरोना काळात आणि आता अनलॉकिंग काळात शाळा प्रश्नावर आणि एकूणच शिक्षणावर सरकारने योग्य पावले उचलायला हवीत, असं पाटील म्हणाले.
(Chandrakant patil Criticized Uddhav Thackeray Government over Arnab Goswami Arrest)
संबंधित बातम्या
मला मारहाण झाली, अर्णव गोस्वामींचा कोर्टात दावा
अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही, पोपट तेच पाळतात : चंद्रकांत पाटील