3 महिन्यात पाच जणांचा बळी, नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
या वाघाने 3 महिन्यात 5 ग्रामस्थांचा जीव घेतला होता. कोलारा गावाजवळच्या जुना कोलारा गेट परिसरातून या वाघाला पकडण्यात आलं.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात धुमाकूळ (Chandrapur Cannibal Tiger Captured) घालत असलेल्या वाघाला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. या वाघाने 3 महिन्यात 5 ग्रामस्थांचा जीव घेतला होता. कोलारा गावाजवळच्या जुना कोलारा गेट परिसरातून या वाघाला पकडण्यात आलं. वाघाला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलवले जाण्याची (Chandrapur Cannibal Tiger Captured) शक्यता आहे.
गेल्या तीन महिन्यात 5 ग्रामस्थांचा बळी घेणारा हा नरभक्षक वाघ ‘केटी-1’ या नावाने ओळखला जातो. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर बफर भागात असलेल्या या वाघाने 7 गावांमध्ये या वाघाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली होती. 7 जून रोजी या वाघाने पाचवा बळी घेतल्यानंतर परिसरात रोष वाढू लागला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्याकडे मागितली. त्यानंतर लगेच पथके स्थापन करुन या वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. या भागातील पाचवा बळी गेलेल्या ठिकाणी पिंजरे लावून वाघाला बेशुद्ध करण्यासाठी पथक सज्ज झाले (Chandrapur Cannibal Tiger Captured). त्यानंतर आज (10 जून) संध्याकाळी याठिकाणी वाघ येताच बेशुद्धीचे इंजेक्शन मारुन त्याला जेरबंद करण्यात आलं.
या वाघााल जेरबंद करुन त्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रवाना करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलवले जाण्याची शक्यता आहे.
5 ग्रामस्थांवर हल्ले करुन किमान दोन डझन पाळीव जनावरांना भक्ष्य करणारा हा वाघ जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे (Chandrapur Cannibal Tiger Captured).
वाघाच्या हल्ल्यात डोळा गमावला, तरीही झुंज देऊन वाघाला पळवलं, चंद्रपुरात थरारhttps://t.co/5CSqFsEq39 #chandrapur #CoronaUpdatesInIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2020
संबंधित बातम्या :
मालवाहतुकीची दरवाढ, ट्रकऐवजी थेट एसटीतून 12 टन कांदा वाहतूक, नगरवरुन APMC मध्ये कांदा दाखल