हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला

4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 12:48 PM

चंद्रपूर : चोरी केली, पण पैशाला हात लावला नाही, असा प्रकार चंद्रपुरात बघायला मिळाला आहे (Chandrapur Honest Thief). चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकाराने संचारबंदीतील वास्तव पुढे आणले आहे. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, केवळ पोटभर जेवून, खिशात पदार्थ भरुन नेले. त्याने गल्ला उघडून रक्कम मोजून जागेवर ठेवली. त्याची प्रामाणिकता पाहून हॉटेलचालकाने देखील पोलीस तक्रार टाळली (Chandrapur Honest Thief).

कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे हाल झाले, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर सचिन हॉटेल आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर आहे. पण, अगदी हायवेवर आहे. याच हॉटेलमध्ये घडलेली ही घटना आहे. चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची यामुळे मोठी अडचण झाली (Chandrapur Honest Thief).

रोजगार नाही, त्यामुळे पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने अन्न पदार्थांची चोरी करण्याचे ठरवले. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बाटली काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बाटली परत फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला.

हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. कदाचित तो घरच्या लोकांसाठी नेत असावा. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे रकाने उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र, ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.

Chandrapur Honest Thief

संबंधित बातम्या :

आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.