‘विनाकारण फिरा रे’वर धडक कारवाई, तासाभरात 470 वाहनधारकांवर बडगा, 100 गाड्या जप्त
आजपासून (1 एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश (Chandrapur police action Vehicle road) दिले आहेत.
चंद्रपूर : राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर चंद्रपुरात विनाकारण (Chandrapur police action Vehicle road) गाडीने रस्त्यावर फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. चंद्रपुरात आजपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही तासातच 470 वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर 100 वाहनं जप्त करण्यात आली. तसेच वैध पास असल्याशिवाय शहरात फिरण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे संचारबंदी असताना विनाकारण शहर भ्रमंती नागरिकांना भोवली आहे.
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून विविध (Chandrapur police action Vehicle road) निर्बंधांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली. हा कर्फ्यू यशस्वी झाल्यावर लगेचच देशभरातील सर्व राज्यात लॉक डाऊन करण्यात आले. चंद्रपूर शहरात संचारबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या व्यक्तीरिक्त अन्य कोणालाही शहरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मात्र तरीही काही नागरिक कारवाईचा इशारा देऊनही रस्त्यावर अकारण फिरत असतात. त्यामुळे आजपासून (1 एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरु केली.
यानंतर पोलिसांनी काही तासातच जवळपास 470 वाहनधारकांना दंड आकारला. तर 100 वाहने जप्त करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असल्यास सोडले जात आहे. तर हे ओळखपत्र नसलेल्या वाहनधारकाना दंड केला जात आहे.
संबंधित बातम्या :
कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी