व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले
18 मार्चपासून पर्यटन बंद असल्याने अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला होता.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आज पासून खुला (Tadoba Andhari Tiger Reserve Open For Tourists) करण्यात आला आहे. अधिकारी, कर्मचारी, जिप्सीचालक, पर्यटक, गाईड यांनी या क्षणी आनंद व्यक्त केला. कोव्हिड नियमांचे पालन करुन हा प्रवेश दिला जाणार आहे. 18 मार्चपासून पर्यटन बंद असल्याने अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला होता. लक्षणे असलेल्या पर्यटकांना मात्र नाकारला जाणार आहे (Tadoba Andhari Tiger Reserve Open For Tourists).
तब्बल सहा महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुलं झाले असून 18 मार्चपासून ताडोबा कोरोना संसर्गाच्या भीतीमूळे बंद आहे. मात्र, कोव्हिडचा शिरकाव रोखण्यासाठी व्यवस्थापनाने काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक केल्या आहेत. ज्यामध्ये एका जिप्सीमध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसवणे, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
एखाद्या पर्यटकाला कोव्हिड सदृश्य लक्षणं आढळल्यास प्रवेश नाकारणार येणार आहे. या हंगामापासून ताडोबाच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट देखील कार्यान्वित झाली असून आता mytadoba.org या साईटवर ताडोबा प्रवेश बुकिंग करता येणार आहे.
दरम्यान, आज पर्यटनाचा प्रारंभ करताना क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी प्रवेशद्वारावर पूजा केली आणि पर्यटनासाठी द्वार खुले केले. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा प्रतिसाद दिसून आला. मरगळ आलेल्या मोहर्ली या गावात आज चैतन्य दिसले. याच गावात ताडोबाचे प्रवेशद्वार असल्याने इथेच हॉटेल, रिसॉर्ट, छोटे-मोठे व्यवसाय, चहाटपऱ्या आहेत. यातून गावाला अर्थार्जन होते. गेल्या सहा महिन्यांपासून हे अर्थचक्र थांबले होते. पण आता ते नव्याने सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे (Tadoba Andhari Tiger Reserve Open For Tourists).
गेले सहा-सात महिने कोरोनाच्या दहशतीने स्वतःला घरात कोंबून घेणाऱ्या लोकांना या संधीमुळे बाहेर पडता आले. मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे. याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे.
ताडोबा सुरु करणे ही मागणी स्थानिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती तेवढीच जोखमीचीसुद्धा आहे. कोरोना संकटाने सहा महिने बंद असलेला ताडोबा प्रकल्प आता असाच निर्विघ्न सुरू राहो, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या हालचालीhttps://t.co/nNJ2rEBEFH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Tadoba Andhari Tiger Reserve Open For Tourists
संबंधित बातम्या :
चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग