सेल्फीच्या नादात जोडपं विहिरीत पडलं, लग्नाच्या तोंडावर तरुणीचा मृत्यू
चेन्नईत तरुण जोडपं विहीरीत पडल्यामुळे 24 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला, तर तरुणावर उपचार सुरु आहेत
चेन्नई : सेल्फी काढण्याच्या नादात तरुण जोडपं विहीरीत पडल्याची दुर्दैवी घटना चेन्नईत घडली. या घटनेत 24 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला, तर तरुणावर उपचार (Couple falls in well) सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचा साखरपुडा झाला होता, तर लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं.
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई सेल्फीच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे. सेल्फीच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चेन्नईतील पट्टबिरम भागातील शेतातल्या विहीरीजवळ घडलेल्या अपघातातही निष्पाप तरुणीला प्राण गमवावे लागले.
चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहिलं ‘वहिनी खूप चांगली आहे’
24 वर्षांची टी मर्सी स्टेफी तिचा होणारा नवरा डी अप्पू याच्यासोबत कांदिगाई गावातील शेतात फिरायला गेली होती. विहिरीच्या पायऱ्यांवर बसून फोटो काढण्याची तिची इच्छा झाली. त्यामुळे दोघांनी यथेच्छ सेल्फी काढले.
फोटो काढताना विहिरीतील पायरीच्या कठड्यावर बसलेल्या स्टेफीचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तिला पकडण्याच्या नादात अप्पूचाही तोल गेला आणि तिच्यामागोमाग तोही विहीरीत पडला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेतकरी विहिरीत उतरला. त्याने अप्पूला वेळीच बाहेर काढलं, पण स्टेफीचा शोध लागेपर्यंत उशिर झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यांनी विहिरीतून स्टेफीचा मृतदेह बाहेर काढला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अप्पूवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळलेला (Couple falls in well) आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.