लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

लग्नाच्या रात्री दाम्पत्याच्या नवविवाहित खोलीतून नातेवाईकांना आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी खोलीचे दार ढकलून उघडले असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. (Chennai Husband Murders Newly Married wife on First Night of Wedding)

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 3:12 PM

चेन्नई : नवविवाहित तरुणाने लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार चेन्नईजवळ उघडकीस आला आहे. पत्नीच्या हत्येनंतर तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. (Chennai Husband Murders Newly Married wife on First Night of Wedding)

तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळील मिंजूर गावात बुधवारी रात्री या अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटना एकामागून एक घडल्या. 24 वर्षीय नितीवासन याने आणि 20 पत्नी वर्षीय संध्या हिची हत्या करुन आत्महत्या केली. ते एकमेकांचे दूरचे नातेवाईक होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर अवघ्या 20 नातेवाईकांच्या उपस्थितीत बुधवारी नितीवासन आणि संध्या यांचा छोटेखानी लग्न सोहळा पार पडला होता.

हेही वाचा : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

लग्नाच्या रात्री दाम्पत्याच्या नवविवाहित खोलीतून नातेवाईकांना संध्याचा आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी खोलीचे दार ढकलून उघडले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या शेजारी पहार पडलेली होती. पती नितीवासन बेपत्ता होता. नातेवाईकांनी पोलिसांना कळविले आणि नितीवासनचा शोध सुरु केला. त्याचा मृतदेह जवळच एका झाडाला लटकलेला आढळला. (Chennai Husband Murders Newly Married wife on First Night of Wedding)

हत्येचं कारण अस्पष्ट

कत्तूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोन्नेरी शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री दोघांमध्ये कोणत्या विषयावर टोकाचे वाद झाले, ज्यामुळे नितीवासनने टोकाचं पाऊल उचलून नवपरिणीत पत्नीची हत्या करत आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :  औरंगाबादेतील सख्ख्या बहीण-भावाच्या हत्येचा उलगडा, चुलत भावाला अटक

नुकतेच, विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या साथीने हत्या केल्यानंतर उद्विग्न पत्नीने आत्महत्या केली होती. प्रेयसीने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रियकरानेही स्वतःला संपवलं होतं. लातूरमध्ये एकमेकांमध्ये गुंतलेल्या मृत्यूच्या या तीन थरारक घटना समोर आल्या होत्या.

(Chennai Husband Murders Newly Married wife on First Night of Wedding)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.