खात्यात पैसे नसलेला चेक बुलडाण्यातील शहिदाच्या कुटुंबीयांना दिला

बुलडाणा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50-50 लाख रुपये जाहीर करण्यात आले आणि या मदतीचा धनादेशही देण्यात आला. पण लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला चेक परत घेण्यात आला. कारण, ज्या खात्यातून […]

खात्यात पैसे नसलेला चेक बुलडाण्यातील शहिदाच्या कुटुंबीयांना दिला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

बुलडाणा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50-50 लाख रुपये जाहीर करण्यात आले आणि या मदतीचा धनादेशही देण्यात आला. पण लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला चेक परत घेण्यात आला. कारण, ज्या खात्यातून चेक दिला होता, त्या खात्यात पैसेच नव्हते. त्यामुळे फक्त फोटो काढण्यापुरता चेक दिला होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

अंत्यसंस्कारानंतर कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना मदतीचा चेक दिला. पण हा चेक बाऊन्स होणार होता. कारण खात्यात पैसेच नव्हते. त्यामुळे हा चेक परत घेण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. बुलडाणा जिल्ह्यातील 33 सुपुत्रांनी आतापर्यंत देशासाठी बलिदान दिलंय. पण मंत्री महोदयांच्या हस्ते आतापर्यंत कुणालाही मदत देण्यात आलेली नाही हे विशेष.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुकातील नितीन राठोड, तर मलकापूर येथील संजय राजपूत दोन्ही जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50-50 लाखांची शासकीय मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामध्ये आई, वडील यांना 20-20 टक्के आणि पत्नीला 60 टक्के अशी शासकीय मदतीचं स्वरूप होतं. या दोन्ही शहीद जवानांवर शासकीय इतमामात सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

चेक परत का घेतला?

मलकापूर येथे संजय राजपूत यांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तर लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीचे धनादेश राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते देण्यात आले आणि त्याचवेळी दिलेले चेक्स परत घेण्यात आले. हा प्रकार समोर आल्याने याबाबत माहिती घेतल्यावर गोपनीय सूत्रांकडून खळबळजनक वास्तव्य समोर आलं. अंत्यसंस्कारच्या दिवशी शासकीय मदतीचा चेक मंत्री महोदयांच्या हस्ते द्यावा म्हणून वरिष्ठ अधिकऱ्यांच्या आदेशाने बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी त्याच दिवशी शहीद राठोड यांच्या कुटुंबीयांना प्रसिद्धीसाठी तात्पुरता चेक दिला आणि त्याच दिवशी तो परत घेण्यात आला. मात्र चेक का परत घेतला याची साधी माहितीही या कुटुंबाला दिली गेली नाही.

पालकमंत्र्यांकडून राठोड कुटुंबीयांना दुसरा चेक सुपूर्द

चेक परत का घेण्यात आले यामागचं खळबळजनक वास्तव समोर आलंय. खात्यामध्ये निधी उपलब्ध नसतानाही हा चेक देण्यात आला. हा चेक परत घेतला नसता तर तो बाऊन्स झाला असता. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी घटनेच्या पाच दिवसांनंतर शहिदांच्या कुटुंबीयांना भेट दिली. खात्यात निधी उपलब्ध नसल्याने चेक बाऊन्स होणार होता म्हणून तो परत घेतला असं सांगत त्यांनी पुन्हा दुसरा चेक राठोड कुटुंबीयांना दिला. लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगण्यात आलंय.

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.