परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध, कोरोना आढावा बैठकीत भुजबळांचा नाशिककरांना इशारा

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून कोविड पश्चात रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे.

परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध, कोरोना आढावा बैठकीत भुजबळांचा नाशिककरांना इशारा
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:15 PM

नाशिक: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिककरांना इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा भुजबळ यांनी या बैठकीत दिला आहे.(Chhagan Bhujbal warns Nashik residents on increasing incidence of corona)

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या 1200 ने वाढली आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 200 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवाळीनंतर वाढत गेलेल्या रुग्णसंख्येमुळं नाशिक जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याचं नवं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे.

जिल्हात ‘पोस्ट कोव्हिड सेंटर’ उभारलं जाणार

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून कोविड पश्चात रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यावी लागणार याबाबत समुपदेशन केलं जाणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोनामुळे लोककलावंतांचे हाल

लोककलावंतांना देखील कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव (Lokshahir Madhukar Jadhav) यांच्यावर अक्षरशः भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनने बहुत्वांशी सर्वच क्षेत्रातील अनेकांचे रोजगार हिरावले गेले. लोककलावंतांवरही कोरोनाने पोटापाण्यासाठी वेगळा पर्याय निवडण्याची वेळ आणली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव यांनाही चरितार्थासाठी  वेगळा पर्याय निवडावा लागला.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे लोककलावंतांचे हाल, नाशिकमधील शाहीरावर भाजीपाला विक्रीची वेळ!

71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार

Chhagan Bhujbal warns Nashik residents on increasing incidence of corona

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.