नक्षलवाद्यांचा भाजपच्या ताफ्यावर हल्ला, आमदारासह पाच जवान शहीद
दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. Shri Bhima Mandavi was a dedicated Karyakarta of the BJP. Diligent and courageous, […]
दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला.
Shri Bhima Mandavi was a dedicated Karyakarta of the BJP. Diligent and courageous, he assiduously served the people of Chhattisgarh. His demise is deeply anguishing. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2019
दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला. आमदार श्यामगिरीहून निघताच त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. याच प्रचारासाठी भीमा मंडावी बैठका घेत होते.
Strongly condemn the Maoist attack in Chhattisgarh. My tributes to the security personnel who were martyred. The sacrifices of these martyrs will not go in vain.
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2019
भाजप आमदार भीमा मंडावी निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीही त्यांनी गावोगाव बैठका सुरु केल्या होत्या. नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर पाळत ठेवत स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर गोळीबारही केला.