रत्नागिरीत 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीत चिकन
चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीतील या शिवभोजन थाळी केंद्रावर हा उपक्रम राबवण्यात आला.
रत्नागिरी : चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, हे (Chicken In Shivbhojan Thali) सांगण्यासाठी रत्नागिरीत एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. सध्या नगरिकांमध्ये शिवभोजन थाळी प्रसिद्ध आहे. याचाच फायदा घेत रत्नागिरीतील एसटी स्टॅण्ड जवळच्या शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळीत चिकन (Chicken In Shivbhojan Thali) वाढण्यात आलं. विषेश म्हणजे ही चिकन थाळी शिवभोजन थाळीच्याच किंमतीत म्हणजे दहा रुपयांत देण्यात आली.
सध्या कोरोना विषाणू जगभरात धुमाकूळ घालत (Chicken In Shivbhojan Thali) आहे. हा विषाणू जीवघेणा आहे खरा. मात्र, त्याहून धोकादायक कोरोना विषाणूसंदर्भातील पसरणाऱ्या अफवा आहेत. अशीच एक अफवा म्हणजे, चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. या अफवेमुळे चिकन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. चिकन व्यवसायिक आणि पोल्ट्री फार्म धारकांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
हेही वाचा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘कलम 144’ लागू, सामूहिक पर्यटनाला बंदी
या अफवेमुळे चिकनचे दर 200 रुपयांवरुन 50-70 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले. तर 5-6 रुपयांना मिळणारी अंडी 2-3 रुपयांवर आली. त्यामुळे पालघर आणि कोल्हापुरातील पोल्ट्री फार्म धारकांनी कोंबडिची पिल्लं आणि अंडी नष्ट केली.
व्यावसायिकांवर हे संकट दूर करण्यासाठी आणि चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीतील या शिवभोजन थाळी केंद्रावर हा उपक्रम राबवण्यात आला.
शिवभोजन थाळीतून फक्त आजच्या (Chicken In Shivbhojan Thali) दिवसासाठी चिकन करी आणि चिकन मसाला असे पदार्थ देण्यात आले. शिवभोजन थाळीच्या दहा रुपये दरातच चिकनचे पदार्थ दिल्याने, याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 32 वर
महाराष्ट्र देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेलं राज्य ठरलं आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये कोरोनाचे 22 रुग्ण आहेत. कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशात 107 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 32 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पुणे – 15
- मुंबई – 5
- नागपूर – 4
- यवतमाळ – 2
- नवी मुंबई – 2
- ठाणे – 1
- कल्याण – 1
- अहमदनगर – 1
- औरंगाबाद – 1
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- एकूण – 32 कोरोनाबाधित रुग्ण
Chicken In Shivbhojan Thali
संबंधित बातम्या :
‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर
Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट
Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील